ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>कोकणातील भूमीच्या कणाकणात शिवसेना भिनलेली आहे- आमदार वैभव नाईक.</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>कोकणातील भूमीच्या कणाकणात शिवसेना भिनलेली आहे- आमदार वैभव नाईक.</em>

प्रकाशन: 26 Jul 2022 04:58 PM
वाचन संख्या 46

तुळसुली त. माणगाव, नेरूर क. नारुर, व माणगाव जि. प. मतदारसंघाची बैठक संपन्न..!

कुडाळ | देवेंद्र गावडे :
केंद्रातील भाजप सरकराने गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल, खाद्य तेल या वस्तूंचे भरमसाठ दर वाढविले. एवढेच नव्हे तर जीवनावश्यक असेलेल्या अन्य धांन्यावरही जीएसटी लावून सर्वसामान्य लोकांना आर्थिक संकटात टाकले आहे. मात्र यावर कोणताही भाजपचा नेता बोलत नाही. महागाई वरून जनतेचे लक्ष विचलित व्हावे यासाठी पक्ष फोडाफोडी, धार्मिक वाद, निर्माण केले जात आहेत.

Article image

निष्ठावंत शिवसैनिकांनी शिवसेना वाढविली आहे. आता शिवसेना पक्षाचा कठीण काळ सुरु आहे. या कठीण काळात सर्वांनी आपआपसातील मतभेद विसरून एकजुटीने संघटना वाढीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. कोकणातील भूमीच्या कणाकणात शिवसेना भिनलेली आहे. त्यामुळे शिवसेना कोणीही संपवू शकत नाही. असे प्रतिपादन कुडाळ मालवणचे शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केले.

Article image


आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सोमवारी तुळसुली त माणगाव जि. प. मतदारसंघाची बैठक वारंगांची तुळसुली येथे, नेरूर क नारुर जि. प. मतदारसंघाची बैठक गोठोस येथे, माणगाव जि. प. मतदारसंघाची बैठक माणगाव येथे संपन्न झाली. या बैठकांनाहि शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना पक्ष संघटना वाढी संदर्भात शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, माजी जी. प. सदस्य राजू कविटकर, उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी,युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी,रुपेश पावसकर,घावनळे विभागप्रमुख रामा धुरी , माणगाव विभागप्रमुख अजित करमलकर, कौशल जोशी,रमाकांत धुरी, मथुरा राऊळ, मिलिंद नाईक, बाळा कोरगावकर, दीपक आंगणे, दिनेश वारंग, पप्पू ताम्हाणेकर, सागर म्हाडगुत, सुधाकर पडकील, प्रशांत घावनळकर, प्रसाद टिळवे, सुधीर राऊळ, बंड्या कुडतरकर, महेश जामदार, मनीषा भोसले आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स