ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कालकथित उत्तम पवार स्मृतिदिनानिमित्त दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वह्या वितरण..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कालकथित उत्तम पवार स्मृतिदिनानिमित्त दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्गच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वह्या वितरण..!

प्रकाशन: 25 Jul 2022 05:43 PM
वाचन संख्या 128

शिरगांव / संतोष साळसकर :
२२ जुलै हा कालकथित उत्तम पवार यांचा स्मृतिदिन.या दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही शाळांमध्ये, दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने सरस्वती विद्या मंदिर कुवळे आणि रेंबवली प्राथमिक शाळा तालुका देवगड येथे मोफत वह्या वितरण करण्यात आले. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर बोलताना संस्थेचे अध्यक्ष आनंद तांबे यांनी कालकथित उत्तम पवार यांचे अपूर्ण राहिलेले सामाजिक काम पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशा प्रकारे प्रतिपादन केले.
यावेळी माजी अध्यक्ष राजेश कदम सचिव सुभाष कदम,किशोर कदम,संतोष तांबे,विशाल हडकर,नितीन नागवेकर,कुवळे गावच्या सरपंच, सौ.संगीता कदम,उपसरपंच प्राध्यापक सुभाष कदम,शाळेचे मुख्याध्यापक परब सर शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल परब व ग्रामपंचायत सदस्य रत्नदीप कुवळेकर आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी तांबे पुढे म्हणाले कि,उत्तम पवार यांनी छात्र भारतीच्या माध्यमातून समाज कार्यास सुरुवात केली.ते उत्तम कवी होते,त्यांच्या कवीचा बी.ए.प्रथम वर्षाच्या अभ्यास क्रमात समाविष्ट आहेत.आंबेडकरी चळवळ पुढे नेण्यासाठी त्यांचे योगदान फार मोलाचे समजले जाते त्यामुळे हा दिवस प्रबोधिनीच्या वतीने संकल्प दिनम्हणून साजरा केला जातो.
उपसरपंच तथा संस्थेचे सचिव सुभाष कदम यांनी प्रास्ताविक करून संस्थेच्या कार्यकर्त्यांची ओळख करून दिली.मुख्याध्यापक परब सर यांनी सर्वांचे स्वागत केले.किशोर कदम सर यांनी उपस्थीत मान्यवरांचे आभार मानले शाळेने केलेल्या सहकार्यांद्दल सचिव सुभाष कदम यांनी सर्वांचे जाहिर आभार मानले. या संस्थेच्या वतीने जिल्ह्यामधील भरणी नं.१, ओटव नं.१ ओटव नं.१ नांदगाव, ओसरगाव नं.१,वेतोरे नमसवाडी वेंगुर्ले,कुर्ली नं.१ वैभववाडी या ही शाळांना संस्थेचे उपाध्यक्ष नरेंद्र तांबे,सुनील तांबे आदी कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनातून मोफत वह्या वाटप करण्यात आल्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स