ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या सिंधुदुर्ग जिल्हा पदाधिकाऱ्यांनी घेतली आमदार नितेश राणे यांची भेट
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या सिंधुदुर्ग जिल्हा पदाधिकाऱ्यांनी घेतली आमदार नितेश राणे यांची भेट

प्रकाशन: 23 Jul 2022 01:27 PM
वाचन संख्या 146

ओबीसी समाजाचे नेते भाजप उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा सचिव नामदेव चव्हाण,भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे होते उपस्थित

कणकवली/प्रतिनिधी: महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे गमावलेले ओबीसीचे राजकीय आरक्षण काल शिंदे-फडणवीसांच्या महायुती सरकारमुळेच पुन्हा मिळवून देत भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करून दाखविले आहे महाराष्ट्र राज्यात ओबीसी राजकीय आरक्षण लागू झाल्यानंतर राज्यात सर्वत्र जल्लोष होत आहे. भाजप महायुती सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे हे आरक्षण मिळाले आहे. त्यामुळे राज्य सरकारचे सर्वत्र अभिनंदन होत आहे याच पार्श्वभूमीवर ओबीसी राजकीय आरक्षण मिळाल्यानंतर पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्हा दौ-यावर असणारे आमदार नितेश राणे यांची भाजप भटके विमुक्त आघाडीच्या सिंधुदुर्ग जिल्हा पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आमदार राणे यांचे आभार मानले. यावेळी ओबीसी समाजाचे नेते भाजप उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा सचिव, आमदार नितेश राणे यांचे निकटवर्तीय कणकवली तळेरे गावचे रहिवाशी नामदेव चव्हाण,भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे,भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा अध्यक्ष किरण चव्हाण, जिल्हा सरचिटणीस शशिकांत इंगळे, लोकसभा संघटक वसंत चव्हाण, बाळकृष्ण खरात, राजू शिंदे, श्री गोसावी आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा अध्यक्ष किरण चव्हाण जिल्हा सरचिटणीस शशिकांत इंगळे यांच्या निवडी बद्दल दोघांनाही आमदार नितेश राणे यांच्याकडून शुभेच्छा देण्यात आल्या.भटके विमुक्त आघाडीच्या वतीने जिल्ह्यात चालू असलेल्या कामाबद्दल आढावा देत असताना त्यावर आमदार राणे यांनी सिंधुदूर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे यांच्या कार्यप्रणालीवर आमचा पूर्ण विश्वास आहे एक उत्कृष्ठ भाषणशैली असलेले शांत व अभ्यासू नेतृत्व भटके विमुक्त आघाडीचे आमच्या पक्षाकडे आहे.त्यांच्या कार्याला आमच्या शुभेच्छा असून तुम्ही सर्वांनी एकजुटीने काम करा करावे, लागेल ते सहकार्य आम्ही आपल्याला देऊ असा शब्द आमदार नितेश राणे यांनी दिला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स