ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शाळेचे ऋण विसरू नका! अध्यक्ष सूर्यकांत पालव यांचे प्रतिपादनबिळवस हाय.येथे दहावी गुणवंतांचा गौरव
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

शाळेचे ऋण विसरू नका! अध्यक्ष सूर्यकांत पालव यांचे प्रतिपादनबिळवस हाय.येथे दहावी गुणवंतांचा गौरव

प्रकाशन: 23 Jul 2022 01:46 PM
वाचन संख्या 29

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : विद्याथ्यानी स्वतः च्या प्रगतीबरोबरच सामाजिक कार्याकडे लक्ष द्यावे. ज्या शाळेत तुम्ही शिक्षण घेतले भविष्यात त्या शाळेला, संस्थेला विसरू नका. जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द आणि चिकाटी कायम ठेवा. ही कार्यकारी संस्था शैक्षणिक कार्यासाठी नेहमीच कार्यरत असेल असे प्रतिपादन बिळवस ग्रामसेवा मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत पालव सर यांनी येथे केले. बिळवस माध्यमिक विद्यालय येथे बिळवस ग्रामसेवा मंडळ मुंबई व माध्यमिक विद्यालय बिळवस यांच्या वतीने दहावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. विद्यार्थ्यांना कार्यकारी मंडळाच्या व इतर दात्यांच्या वतीने रोख रक्कम आणि फोल्डर फाईल यांचे वितरण व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी विध्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यामधून आपले मनोगत व्यक्त करताना शाळेतील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली विद्यार्थीनी कुमारी, सानिका श्रीराम पालव हिने अभ्यासातील सातत्य व अभ्यासाचे योग्य नियोजन याबाबत माहिती दिली. यावेळी सरपंच सौ. मानसी पालव, सरचिटणीस अशोक जनार्दन पालव, कार्याध्यक्ष दाजी विश्राम पालव, माजी अध्यक्ष अँड. नंदकिशोर धाकू पालव,माजी सरचिटणीस दिपक पालव, शालेय समिती उपाध्यक्ष गोविंद सावंत, मुख्याध्यापक जयवंत ठाकूर,माजी मुख्याध्यापक श्री कांबळे सर, तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी शाळा समिती सदस्य, उत्तीर्ण विद्यार्थ्याचे पालक, ग्रामस्थ व कार्यकारी मंडळाचे इतर सदस्य उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रशालेच्या शिक्षिका सौ कदम मॅडम, प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. ठाकूर सर तसेच आभार श्री. नाईक सर यांनी मानले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स