ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
<em>शिक्षक समितीचा हिरकमहोत्सवी वर्धापनदिन विविध उपक्रमांनी संपन्न…!</em>
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

<em>शिक्षक समितीचा हिरकमहोत्सवी वर्धापनदिन विविध उपक्रमांनी संपन्न…!</em>

प्रकाशन: 22 Jul 2022 05:49 PM
वाचन संख्या 107

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
न्यायाची चाड व अन्यायाची चीड हे ब्रिदवाक्य घेऊन कार्यरत असणारी शिक्षक समिती ही शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसोबतच विद्यार्थी हित जोपासत अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवणारी एकमेव शिक्षक संघटना असल्याचे प्रतिपादन तालुकाध्यक्ष टोनी म्हापसेकर यांनी शिक्षक समितीच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
२२ जुलै २०२२ रोजी शिक्षक समितीच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिनाच्या निमित्ताने तालुका शाखा कणकवलीच्या वतीने जि. प. प्राथमिक शाळा जानवली मारुती मंदिर येथे पर्यावरण रक्षणाचा संदेश देत वृक्षारोपण कार्यक्रम व इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती मार्गदर्शन उपक्रमाचा शुभारंभ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिक्षक समिती कणकवली सातत्याने अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवत असते. यावेळी वर्धापन दिनाचे औचित्य साधत शिक्षक समिती कणकवलीने इयत्ता ५ वी च्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा तसेच अन्य स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयुक्त ठरेल अशा मार्गदर्शन उपक्रमाचा शुभारंभ केला. समितीच्या अनेक उपक्रमशील शिक्षक सदस्यांच्या सहकार्यातून शिष्यवृत्ती संदर्भात मार्गदर्शन करणार्‍या व्हिडिओची निर्मिती करून ते व्हिडिओ प्रत्येक आठवड्याला यूट्यूब चैनलवर प्रसारित करण्यात येणार आहेत. हा उपक्रम सर्व विद्यार्थी – शिक्षकांना उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडिस यांनी केले.
या कार्यक्रमाला तालुका शाखेचे कार्याध्यक्ष दिलीप धामापुरकर, प्रशांत दळवी, प्रवक्ता विनायक जाधव, पतपेढी संचालक आनंद तांबे, जिल्हा कार्यकारी सदस्य संतोष कुडाळकर, अजय तांबे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख निकिता ठाकूर, उपाध्यक्ष सदानंद ठाकूर, कोषाध्यक्ष महेश चव्हाण, महिला आघाडी सचिव नेहा मोरे, कार्यालयीन चिटणीस समीर पाटील, सहसचिव संतोष कांबळे, विभाग अध्यक्ष हेमंत राणे, प्रसिद्धीप्रमुख प्रविण कुबल, कार्यक्रमाच्या आयोजनात सहकार्य करणारे जानवली मारुती मंदिर शाळेचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रदीप मांजरेकर, उपक्रमशील शिक्षिका मंजिरी मराठे, सुजाता साठविलकर, राजेश कदम, सुशांत मर्गज, सचिन सावंत, संदीप जाधव, संदीप गोसावी, स्नेहल गोसावी, श्रीकृष्ण कांबळी आदी समिती सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सरचिटणीस महेंद्र पवार यांनी केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स