<em>सावंतवाडीत मालवाहू गाडीचे चार डबे सुटले मोठी दुर्घटना टळली….!</em>
सावंतवाडी | प्रतिनिधी :
गोव्याच्या दिशेने जात असलेल्या कोळसावाहू मालवाहू गाडीचे चार डबे सुटून स्टेशनवर राहिले. दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
स्टेशनपासून अलिकडे या गाडीच्या काही लोखंडी पट्टी खांबाला अडकून मोठा आवाज झाला. त्यानंतर चार डबे सुटले. या डब्यांच्या मागे गार्ड केबिनही नव्हती. या घटनेनंतर गाडी थांबविण्यात आली. रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी डबे जोडून गाडी पूर्ववत केली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)