ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
भाजपा अनुसूचित जाती जमाती पदी चंद्रकांत जाधव ; तर उपाध्यक्ष पदी अनंत आसोलकर.

भाजपा अनुसूचित जाती जमाती पदी चंद्रकांत जाधव ; तर उपाध्यक्ष पदी अनंत आसोलकर.

प्रकाशन: 20 Jul 2022 11:04 PM
वाचन संख्या 32

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत कार्यकारिणी जाहिर..

कणकवली | प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा पक्षाची बैठक कणकवली तालुका येथे भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. कणकवली भाजपा मध्यवर्ती कार्यालय कणकवली येथे सिंधुदुर्ग अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष निवड सभा आयोजित करण्यात आली होती. सिंधुदुर्ग अनुसूचित जाती – जमाती मोर्चाची नवीन कार्यकारणी यावेळी तयार करण्यात आली.
या कार्यकारिणीत चंद्रकांत भोजू जाधव भाजपा अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष, अनंत आसोलकर भाजपा अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष, अंकुश विष्णू जाधव अनुसूचित जाती. मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा सल्लागार, किरण देवेंद्र जाधव अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा संघटक सरचिटणीस, गुरुप्रसाद भगवान चव्हाण अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस, विष्णू तेंडोलकर अनुसूचित जाती सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस, अशोक कांबळे
अनु .जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस,
तर अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा सदस्य पदी चंद्रकांत वालावलकर, दशरथ गावकर, सुधाकर जाधव, कृष्णा चव्हाण, अजित तांबे, गणेश तांबे, सुदेश किनवडेकर,बाळा जाधव, विलास कुडाळकर, राजन जाधव, प्रयाग कांबळे यांची निवड करण्यात आली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स