एक शिल्पसत्य..
मालवण |सुयोग पंडित : ..एक काळ .होता की महिला सामाजिक आणि राजकीय विषयापासून थोड्या दूरच रहायच्या…
काळ बदलला..
धडाडी..सच्चाई याची किंमत महिलांनी ओळखली..कारण पन्हाळगडाखाली वेढा लागलेला तेंव्हा सन्माननीय जिजाऊंनी तलवार काढली..
जाऊन देत..इतिहास सर्वांनाच माहीत आहे.
नंतर मालवण शहरात एक मुलगी आली…(तिची सासूही पंचायत समितीतून अध्यक्ष होती…पण एकही आरोप नाहीय त्या आईवर)
ती मुलगी एअर हैस्टेस होती..
तिने एका अस्सल दबंग माणसाशी लग्नही केले..
मालवणमधील छोट्या मोठ्या समस्या…महिलांच्या गरजा तिने डोक्यात पूर्ण वेळ ठेवून अभ्यासल्या..
तिला फसवलेले चेहरे आजही पुढ्यात आहेत…पण ती कोणालाही कधीच दुखवत नाही.
गल्लीतला अजगर ते रक्ताची मदत ती हसत हसत करते..
एखादे महिलांचे ढोलपथक काढायचा विचारही कोणाला सुचला नसता..
पण तिने काढून खूप महिलांना ओळख दिली..
आता हे आजच मी का लिहीतोय याचे उत्तर कॅलेंडरमध्ये नाही..
माझ्या आजीचा वाढदिवस आहे आज..
आणि आजीच्या दर्जाची सच्चं कार्य करणारी..
शिल्पा यतीन खोत माझी सख्खी बहीण आहे..
नांव..आडणांव वगैरे विषय कधीच करु नये..
सख्खी ही सख्खी
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)