संकटकाळात पोलिसांच्या खांद्याला-खांदा लावून मदत करणाऱ्या तरुणांचा आम्हाला अभिमान- राजेंद्र दाभाडे.
करूळ येथे स्थापन करण्यात आलेल्या ग्राम संरक्षक पथकाची बैठक संपन्न…
वैभववाडी |नवलराज काळे : समाजातील प्रत्येक माणूस हा पोलीस आहे. प्रत्येकाने पोलिसासारखं राहिले पाहिजे. संकटकाळात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून मदत करणाऱ्या तरुणांचा पोलीस खात्याला अभिमान आहे. पोलिसांवर सामाजिक कार्य करण्यासाठी संस्थांनी पुढे आले पाहिजे. असे प्रतिपादन सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी व्यक्त केले. करूळ येथे स्थापन करण्यात आलेल्या ग्राम संरक्षक पथकाची बैठक श्री राजेंद्र दाभाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दाभाडे यांच्या संकल्पनेतून हे ग्राम संरक्षक पथक स्थापन करण्यात आले आहे. करुळ ग्रामपंचायत येथे पार पडलेल्या बैठकीत यावेळी पथकातील सर्व सदस्यांना टी-शर्ट, बॅटरी व शिट्टी आदी साहित्याचे वाटप दाभाडे यांनी केले. यावेळी पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई, जिल्हा बँक माजी संचालक दिगंबर पाटील, निवृत्त पोलीस अधिकारी संदीप सरवणकर, तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र पवार, माजी सरपंच हिंदुराव पाटील, सह्याद्री जीवरक्षक अध्यक्ष हेमंत पाटील, ग्रामसेवक शशिकांत गुरव, शरद सावंत, रमेश पांचाळ व पथकातील सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)