<em>शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात कै. पुंडलिक अंबाजी कर्ले यांची जयंती उत्साहात.</em>
कार्यक्रमाचे औचित्य साधून वरिष्ठ महाविद्यालयाच्या नूतन इमारतीमध्ये वर्गांचे स्थलांतर आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न.
शिरगांव | संतोष साळसकर :
शिरगांव पंचक्रोशी (तालुका देवगड) शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. पुंडलिक अंबाजी कर्ले यांचा जयंती सोहळा आज शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे संस्थेचे उपाध्यक्ष संभाजी साटम यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य या वरिष्ठ महाविद्यालयाच्या नूतन इमारतीमध्ये वर्गांचे स्थलांतर करण्यात आले. याचवेळी मार्च/ एप्रिल २०२२ मधे घेण्यात आलेल्या १० वी/ १२ वी. शालांत परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच तृतीय वर्ष कला व वाणिज्य शाखेच्या (प्रथम बॅच २०२१ – २२) या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष संभाजी साटम,सचिव प्रकाश चव्हाण,खजिनदार रघुनाथ चव्हाण,मानद अधीक्षक रवींद्र जोगल,सरपंच समीर शिरगावकर,उपसरपंच अमित साटम, प्राचार्य शमशुधिन अत्तार, माजी प्राचार्य तथा कुवळे हायस्कूल चे चेअरमन विजयकुमार कदम, आरेश्वर हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक तुळशीदास डामरी , एडव्होकेट प्रकाश जाधव,प्रदीप साटम, संदीप साटम,सहदेव लोके,मंगेश लोके,हेमंत देसाई,सुधीर साटम,आर.जी. सावंत,राजेंद्र साटम,सुगंधा साटम,संतोष कुमार फाटक,शैलेंद्र जाधव,गणपत तावडे,वसंत साटम आदींसह इतर संस्था पदाधिकारी, ग्रामस्थ,पालक,शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी प्राचार्य विजयकुमार कदम म्हणाले की, आजचा दिवस हा प्रेरणा दिन आहे. कै. पुंडलिक अंबाजी कर्ले हे खऱ्या अर्थाने समाजपुरूष होते. असे सांगितले.तर आरेश्र्वर हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक तुळशीदास डामरी म्हणाले की, शिरगाव ही शैक्षणिक नगरी असून कर्ले साहेब हे सर्वांसाठी ऋषितुल्य महापुरुष होते.त्यांनी निस्वार्थीपणे शैक्षणिक कार्य केले.असे सांगितले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगते मांडली. यावेळी संस्थेच्या वतीने तुळशीदास डामरी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी नूतन इमारती मधे झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य शेखर गवस यांनी तर आभार प्रदर्शन एडव्होकेट प्रकाश जाधव यांनी केले. तर जयंती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर करडे यांनी तर आभारप्रदर्शन एस.एन. धुरी यांनी केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)