ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
" सनी बॅंकर " चित्रपटातील भूमिकेसाठी बिग बी अमिताभ बच्चन यांचा होकार…!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

" सनी बॅंकर " चित्रपटातील भूमिकेसाठी बिग बी अमिताभ बच्चन यांचा होकार…!

प्रकाशन: 15 Jul 2022 04:21 PM
वाचन संख्या 308

अनिल सरमळकर ठरणार महानायक अमिताभ यांना दिग्दर्शन करणारे कोकणातील पहिले चित्रपट दिग्दर्शक…

ब्यूरो न्यूज |सावंतवाडी :
सिंधुदुर्गातील आघाडीचे तरूण ‘ द फॉक्स ‘ फेम कवी लेखक नाटककार दिग्दर्शक अनिल सरमळकर यांनी आता चित्रपट क्षेत्रातही प्रवेश केला असुन त्यांनी लिहिलेला दिग्दर्शित आणि निर्मिती केलेला कोकणातील पहिला मराठी चित्रपट ‘ काहूर ‘ अनेक अडचणींवर मात करुन आगामी काळात तो प्रदर्शनासाठी तयार होत असतांना अनिल सरमळकर आणि कोकणातील चित्रपट क्षेत्राला एक सुखद धक्का मिळत आहे तो म्हणजे
अनिल सरमळकर लिखित दिग्दर्शित आगामी नियोजित महत्वाकांक्षी चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांच्यासाठी त्यांनी भूमिका लिहिली होती ती भूमिका करण्यास बिग बी यांचा होकार मिळत असल्याचे खात्रीलायक वृत्त सनी बॅंकर या चित्रपटाचे सहनिर्माते आणि प्रोडक्शन मॅनेजमेन्ट संभाळणार्या ‘ फिलिपाईन्स फिल्म प्रोडक्शन्सच्या वतीने देण्यात आले आहे.

Article image

खुद्द बिग बी यांचा होकार मिळाल्यानंतर आपणाला कधी नव्हे इतका आनंद झाल्याचे सनी बॅंकर ‘ लेखक दिग्दर्शक अनिल सरमळकर यांनी सांगितले ते म्हणाले गेली विस वर्षे मी अहोरात्र जो कलेचा साहित्याचा ध्यास घेतला होता त्याचे कुठेतरी आज सार्थक होत आहे असे मला वाटते. महानायक अमिताभ यांचा होकार मिळणे या भूमिकेसाठी हा माझा माझ्या लेखनाचा गौरव आहे असे मी समजतो कारण अमिताभ म्हणजे कलेचा हिमालय आहेत आणि मी तर चित्रपट क्षेत्रात कलेत एक लहानसे मुल आहे अद्याप, मात्र ही भूमिका मी त्यांच्यासाठीच लिहिली होती पण मी ते केवळ एक स्वप्न पाहत होतो की एवढा महान नटरंग ही भूमिका करेल का ? पण आज त्यांच्या होकारानेही मला प्रचंड मोठे बळ दिले आहे आणि त्याचवेळी मी गंभीरही झालो आहे कारण हे शिवधनुष्य आहे. मात्र एवढे नक्की की मी इंडस्ट्रीमधील अत्यंत प्रोफेशनल आणि तगडी टीम घेवूनच उतरणार आहे. दरम्यान माझे टीम बांधण्याचे काम आधीच सुरु झाले आहे
असे अनिल सरमळकर यांनी सांगितले.

सनी बॅंकर ही अनिल यांची पहीली हिंदी फिल्म असेल तसेच ती इंग्रजीतुनही जगभरातील फिल्म फेस्टिव्हल्समधुन दाखविली जाणार आहे तथापि महानायक अमिताभ बच्चन यांना दिग्दर्शन करणारे अनिल सरमळकर हे कोकणातील पहिले लेखक दिग्दर्शक असणार आहेत.

तसेच या चित्रपटात ज्येष्ठ नाटककार रंगकर्मी अभिनेते मकरंद देशपांडे रणदीप हुडा ,सौमित्र किशोर कदम आदी कलाकार भूमिका करतील तर
अभिनेत्री आणि इतर अनेक कॅरक्टर्ससाठी कास्टिंग प्रकिया मुंबईत सुरु होणार आहे.

सनी बॅंकर ‘ ही एक ब्लॅक कॉमेडी असुन कथेमधे मॅजिक रिॲलिजम आणि व्हीएफएक्सचाही महत्वपूर्ण वापर करण्यात येणार आहे
तेवढीच ही कथा अनेक वळणे घेत अत्यंत गंभीर असे सामाजिक भाष्य करणारी आहे. यामधील बिग बी यांची भूमिका महत्वाची असुन त्या भुमिकेबद्दल उत्सुकता आहे.

फिलिपाईन्स फिल्म प्रोडक्शन्स हे या चित्रपटाचे एक मुख्य निर्मिती
प्रेरक असुन इतर काही प्रोडक्शन्स संस्था सहभागी होणार आहेत.

गेली दोन दशके सामाजिक चळवळ मराठी इंग्रजीतुन कवीता कादंबरी समीक्षा वैचारिक लेखन नाट्यलेखन दिग्दर्शन करत आता डॉ. अनिल सरमळकर यांनी कोकणात राहूनही चित्रपट क्षेत्रात उतरण्याचे धाडस दाखवले आहे आणि एवढेच नव्हे तर बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत चित्रपट करण्याचे कलात्मक धैर्य दाखवित ते मुख्य प्रवाहात प्रवेश करत असल्याने त्यांचे खासकरून कोकणातून स्वागत होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स