मसुरे देऊळवाडा येथे भरली बांधावरची शाळा..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
जि. प. सिंधुदुर्गच्या वतीने आयोजित बांधावरची शाळा हा उपक्रम मसुरे देऊळवाडा शाळेच्या वतीने नाडाळा येथे शेती क्षेत्रावर आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी शेतकरी होऊन नांगरणी केली तर विद्यार्थिनींनी काढणी, लावणी यासारख्या विविध कामांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. प्रशालेचे मुख्याध्यापक प्रशांत पारकर, शिक्षक सचिन कोपरकर, स्वाती कोपरकर, सापळे मॅडम याचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)