वराडकर हायस्कूल कट्टाच्या वतीने सेवानिवृत्त शिक्षकांना अनोखी 'गुरुवंदना'….!
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टाच्या वतीने प्रशालेतील सेवानिवृत्त माजी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे श्री सुरेश शामराव ठाकूर (अध्यक्ष कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण)यांनीआपल्या मनोगतातुन प्रशालेच्या या अनोख्या उपक्रमाला भरभरून शुभेच्छा दिल्या .
आज गुरुपौर्णिमा असून आजचा कार्यक्रम हा बघायचा नसून अनुभव घेण्याचा आहे. माझ्या आयुष्यात असा गुरुजनांचा सत्कार करून गुरुवंदना चा कार्यक्रम केला याबद्दल मी माझे भाग्य समजतो. विचारांच्या बरोबर आज आचरणाचा दिवस. मी साक्षात अनुभवत असून आज सेवानिवृत्त शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतरांचा झालेला सन्मान हा इतर सन्मानापेक्षा अद्वितीय आहे अशा गौरवपर शब्दात कार्यक्रमाच्या आयोजनाचे कौतुक केले.
सर्व माजी मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना एकाच व्यासपीठावर आणून शाळेच्या इतिहासात प्रथमच एक नाविन्यपूर्ण उपक्रम संपन्न झाला त्याबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अजयराज वराडकर यांनी शिक्षकांचे आभार मानले, तसेच शाळेच्या पुढील उपक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित माजी मुख्याध्यापिका श्रीमती व्ही .पी. किणीकर यांनी आपल्यावर केलेल्या संस्काराबद्दल गुरुजनांचे आभार मानले यावेळी श्री ढोलम सर श्रीमती वजे मॅडम या मान्यवरांच्या विषयी बोलताना शिस्त व गुरु विषयीचा आदर आपल्या जीवनात किती महत्त्वाचा आहे, याबद्दलची जाणीव उपस्थित विद्यार्थ्यांना करून दिली. या कार्यक्रम प्रसंगी नूतन मुख्याध्यापक श्री संजय सुभाष नाईक यांचा सत्कार वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टा मुख्याध्यापक श्री ऋषी नाईक सर्व शिक्षक- शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने आकर्षक भेट देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे ईशस्तवन प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सादर केले व संगीत साथ श्री सावंत आर .ए .यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संजय पेंडुरकर श्री समीर चांदरकर सौ .विणा शिरोडकर यांनी केले आभार प्रदर्शन सौ देवयानी गावडे यांनी केले .कार्यक्रमाचे छाया चित्रण श्री भूषण गावडे यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. काकासाहेब वराडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून करण्यात आली यानंतर आपल्या नेहमीच्या अध्यापक कक्षामध्ये सर्व सेवानिवृत्त शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजळा दिला . यानंतर सर्व सेवानिवृत्त शिक्षकांना व्यासपीठावर आमंत्रित करून सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाचे अध्यक्ष श्री अजय राज वराडकर ,उपाध्यक्ष श्री. आनंद वराडकर ,सचिव श्री. सुनील नाईक खजिनदार श्याम पावसकर ,स्कूल कमिटी अध्यक्ष श्री.सुधीर वराडकर . उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती वासंती पंडितराव किणीकर .ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती पद्मजा प्रमोद वझे, श्री. साबाजी गावडे यांनी, श्री. सुभाष वासुदेव माडगूत, श्री सामंत जयवंत बाबुराव ,माजी मुख्याध्यापक श्री .सर्जेराव पाटील, श्री अनिल फणसेकर ,माजी मुख्याध्यापक, श्री मोहन लिंकर, श्री पूर्णानंद नाडकर्णी,श्रीम. संध्या तांबे , श्री प्रकाश कदम, वरिष्ठ लिपिक श्री सुरेश कदम, माजि प्रयोगशाळा सहाय्यक तथा विद्यमान संस्था सचिव श्रीमती विजयश्री देसाई . माजी ग्रंथपाल तथा विद्यामन संचालिका स्वाती वराडकर.माझी शिपाई श्री महादेव वाईरकर .यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला जो सन्मान मिळाला त्याबद्दल समाधान व्यक्त करताना माझी सर्व सेवानिवृत्त शिक्षक- शिक्षिका यांनी मुख्याध्यापक, संस्था अध्यक्ष व पदाधिकारी तसेच सर्व शिक्षक शिक्षिका- शिक्षिकेतर कर्मचारी यांचे मनापासून आभार मानले व अवर्णनीय शब्दात आपले मत व्यक्त केले. या कार्यक्रमानंतर गुरु -शिष्य महिमेचे वर्णन करणारा दशावतार नाट्य प्रयोगातून गुरु शिष्याची महती ची माहिती विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. अशा प्रकारे गुरुवंदना कार्यक्रमाची सांगता झाली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)