ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
<em>देवगड महाविद्यालयाच्या प्रतिक घाडीगांवकरचे शूटिंग स्पर्धेत यश.</em>

<em>देवगड महाविद्यालयाच्या प्रतिक घाडीगांवकरचे शूटिंग स्पर्धेत यश.</em>

प्रकाशन: 14 Jul 2022 10:02 PM
वाचन संख्या 40

शिरगांव | संतोष साळसकर :
चंदिगढ येथे ४-१५ जुलै २०२२ मध्ये झालेल्या इंटर डायरेक्टोरेट शूटिंग स्पर्धेत देवगड कॉलेज NCC Unit च्या लान्स कॉर्पोरल प्रतिक पांडुरंग घाडीगांवकरची ने ५८ MAH BN चे प्रतिनिधित्व केले. एकूण १२ पदकांसह महाराष्ट्र डायरेक्टोरेट ने अव्वल स्थान मिळवत ही शूटिंग चॅम्पयनशिप जिंकली. प्रतिकची निवड G. V. मालवणकर चॅम्पियनशिप (प्रि- नॅशनल) साठी झाली आहे. यामध्ये यशस्वी ठरल्यास प्रतिक भारताचे प्रतिनिधित्व करीत आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकेल. २०१९ पासून देवगड महाविद्यालयामध्ये आर्मी NCC चे १०७ कॅडेटस् चे युनिट पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. कॅम्प, फिटनेस ट्रेनिंग, शूटिंग, आपत्ती व्यवस्थापन इ. चे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना NCC मधून दिले जाते. प्रतिकला देवगड कॉलेजच्या NCC ऑफिसर लेफ्ट. डॉ. सुनेत्रा ढेरे, केअर टेकर प्रसाद मालवणकर, ५८ MAH BN आणि पुणे ग्रुप HQ चे स्टाफ यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य, सर्व स्टाफ आणि संस्था पदाधिकऱ्यांकडून प्रतिकचे मनःपूर्वक अभिनंदन.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स