ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
अ.शि.दे. टोपीवाला हायस्कूल मालवण येथे गुरूपौर्णिमे निमित्त गुरूवंदनेचा कार्यक्रम संपन्न….!

अ.शि.दे. टोपीवाला हायस्कूल मालवण येथे गुरूपौर्णिमे निमित्त गुरूवंदनेचा कार्यक्रम संपन्न….!

प्रकाशन: 14 Jul 2022 08:48 PM
वाचन संख्या 51

मालवण |‍ सुयोग पंडित :
बुधवार दिनांक १३ जुलैला गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून, अ.शि.दे. टोपीवाला हायस्कूल मालवण येथे प्रशालेच्या मध्यवर्ती सभागृहात गुरूवंदनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
ईशस्तवन आणि दीपप्रज्वलनाने या पवित्र कार्यक्रमाची सुरूवात झाली. प्रातिनिधिक स्वरुपात श्रीव्यास महर्षींच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. सौ. तांबे मॅडमनी ईशस्तवन गायिले. मराठी विभागप्रमुख श्री. वेरलकर सरांनी मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.प्रशालेचे पर्यवेक्षक श्री.प्रभुखानोलकर सरांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यानंतर कार्यक्रमाचे प्र. अतिथी मा. श्री. संजय जोशी सरांनी सर्वांना उद्बोधित केले. श्रीव्यासांचे महात्म्य त्यांनी आपल्या भाषणातून मांडले.
सर्व शिक्षकांना वर्गप्रमुखांनी पुष्प अर्पण करून गुरूंविषयीची कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्या. मा. श्री. खानोलकर सरांनी अध्यक्षीय भाषणात संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेतला, तसेच सर्वांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सांगता श्रीगुरूस्तोत्रांनी झाली. श्रीगुरूस्तवन सौ. सामंत मॅडमनी गायिले. त्यानंतर प्रसाद वाटप झाले. हा प्रसाद सौ.बांदेकर मॅडमनी गुरूवंदनेसाठी आणला होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. तोरसकर मॅडमनी केले.सदर कार्यक्रमाचे आयोजन हायस्कूलच्या मराठी विभागाकडून करण्यात आले होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स