नारायण राणेंना जामीन मंजूर होताच कणकवली जल्लोष
कणकवली / उमेश परब : केंद्रीय मंत्री नाम. नारायण राणे यांना जामिन मंजूर होताच भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसभर आपल्या नेत्याच्या अटकेमुळे तणावात असलेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी कणकवली पटवर्धन चौकात फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी विजय चिंदरकर, सचिन बांदिवडेकर, संदिप मेस्त्री, स्वप्नील चिंदरकर, हृतिक नलावडे, निखिल आचरेकर, राजा पाटकर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)