कर्जाच्या तणावामुळे शैलेश तांबे यांच्याकडून भैय्याचा पेट्रोलने जाळून खून…
कणकवली पोलिसाकडून बनाव उघड; अंत्यसंस्कार झालेला तरूण परत आल्याच्या प्रकरणाचा “पोलखोल”…
कणकवली | उमेश परब :कर्जाच्या तणावातून असलदे येथील शैलेश तांबे या रेल्वे कर्मचाऱ्याने आपल्याच मृत्यूचा कट स्वतः रचल्याचा प्रकार पोलीस तपासात उघड झाला आहे. विशेष म्हणजे कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्याने एका परप्रांतीय भैय्याला गोवा-मडगाव येथून आणून कोळशी माळरान परिसरात जिवंत जाळले.तत्पूर्वी त्याला दारू पाजली, असा खुलासा त्याने स्वतः पोलिसांकडे केला आहे. त्यामुळे हा खून असल्याचे तपासात उघड झाले. दरम्यान याबाबत तांबे याने आपल्या पत्नीलाही अंधारात ठेवल्याचे तीचे म्हणणे आहे. आपल्याला पतीच्या नावे अज्ञात व्यक्तीचे फोन येत आहेत, अशी तक्रार पत्नीने यापूर्वी पोलीसात केली होती. मात्र वैभववाडी येथे मारहाण झाल्यानंतर शैलेश याने केलेला बनाव उघड झाला,असे पोलिसांचे म्हणणे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शैलेश तांबे हा मुख्य संशयीत काल वैभववाडी येथे आपल्याला मारहाण झाली, असे सांगून वैभववाडी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेला. मात्र त्या ठिकाणी गेल्यानंतर तेथील पोलिसांनी कणकवली पोलिसांनी संपर्क साधला व आपल्या हद्दीतील तांबे नामक व्यक्ती या ठिकाणी तक्रार देण्यासाठी आली आहे. ती नेमकी कोण ?, अशी माहिती घेतली. यावेळी संबंधित नावाची व्यक्ती एक महिन्यापूर्वी मृत झाली आहे. तिच्यावर अंत्यसंस्कार देखील झाले आहेत.मग तेथे आलेला कोण असा प्रश्न पोलिसांसमोर निर्माण झाला. त्यानंतर तेथील पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून चौकशी करण्यास सुरुवात केली. यावेळी आपण मयत नसून जिवंत आहे. असे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर त्याला कणकवली पोलिस ठाण्यात आणण्यात आले. व चौकशी करण्यात आली असता आपण कर्जाच्या तणावातून हा सर्व प्रकार केला. मडगाव येथे जाऊन एका अज्ञात भैय्याला कोळशी येथे घेऊन आलो, त्याला दारू पाजली, आणि त्यानंतर त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याचा खून केला, असे त्याने पोलिसांना सांगितले. दरम्यान या प्रकाराबाबत तिच्या पतीला कोणती माहिती नव्हती, परंतु काही दिवसांपूर्वी आपल्याला कोणीतरी अज्ञात व्यक्ती फोन करून मी तुझा पती आहे, असे सांगत आहे, असे पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला. यावेळी चौकशी केली असता हा सर्व प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक श्री मुल्ला करीत आहे. याबाबतची तक्रार सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोहर रावराणे व श्री.खंडाळे यांनी दिली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)