श्री ठाणेश्वर मित्रमंडळ वायंगणी कडून २६ आँगस्ट रोजी रक्तदानाचे आयोजन
आचरा । विवेक परब : “रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” हा संकल्प यशस्वी करण्याचा उद्देश ठेवून वायंगणी येथील श्री ठाणेश्वर मित्रमंडळ यांच्या कडून गुरुवार दिनांक २६आँगस्ट २०२१ रोजी सकाळी १० ते दुपारी १.३० पर्यंत ग्रामपंचायत वायगंणी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
रक्तदान करण्यासाठी, शुभम त्रिंबककर-८०८०१५७२७५, रितेश लाड-७८७५१३६९८६, संकेत पाटील-७७४४८७७५४८, गुरु आचरेकर-९३०७८४२९२४ या व्यक्तीशी संपर्क साधण्याचे आव्हान संस्थेकडून करण्यात आले आहे.
सदर शिबिर हे कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करुन व मास्क, सँनेटायझर वापरून घेण्यात येणार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)