ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, विलेपार्लेचे राष्ट्रीय स्पर्धेत यश.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, विलेपार्लेचे राष्ट्रीय स्पर्धेत यश.

प्रकाशन: 04 Jul 2022 11:55 AM
वाचन संख्या 64

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : नुकत्याच राजकोट येथे पार पडलेल्या 38 सब ज्युनियर आणि 48 ज्युनियर डायव्हिंग नॅशनल चॅम्पियनशिप http://localhost/news/public/uploads/2022 या स्पर्धेमधे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती संचालित प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, विलेपार्ले च्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले. मुलींच्या १८ वर्षा खालील आणि १३ वर्षाखालील गटात महाराष्ट्राच्या संघाने सांघिक विजेतेपद पटकाविले तर मुलांच्या तिन्ही गटात सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड च्या संघाने सांघिक विजेतेपदाची ट्रॉफी पटकावली.
या स्पर्धेत महाराष्ट्राला एकूण ५ सुवर्ण पदके, ७ रौप्य पदक आणि ८ कांस्य पदके मिळाली आहे.
या खेळातील काही स्पर्धकांनी विशेष कामगिरीने तिथल्य प्रत्येकाचीच मन जिंकून गोल्डन गर्ल आणि गोल्डन बॉय असे किताब मिळवले.या स्पर्धेचे सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राच्या संघात प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात सराव करणाऱ्या ४ खेळाडूंची निवड झाली होती. संकुलाची क्षमा बंगेरा हीने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत मुलींच्या १८ वर्षा खालील गटात १ मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग आणि ३ मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग दोन्ही क्रीडा प्रकरात सुवर्ण पदक पटकावले. वयाच्या १२ वर्षा पासून क्षमा हीने संकुलात डायव्हिंग या खेळाचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि ५ वर्षांच्या सततच्या प्रयत्नांनी तीने इथ पर्यंत मजल मारली. केया प्रभु हीने मुलींच्य १५ वर्षा खालील गटात १मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग या प्रकारात रौप्य तर हायबोर्ड डायव्हिंग या प्रकारात कांस्य पदक पटकावले. मुलांच्या १८ वर्षाखालील गटात कबीर राव याने १ मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग आणि ३ मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग या दोन्ही क्रीडा प्रकारात सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड च्य मुलांशी सामना करत कांस्य पदक पटकावले तर स्वराज लाड याने प्रथमच राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन मुलांच्या १३ वर्षा खालील गटात १ मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग या प्रकारात कांस्य पदक पटकावले

संकुलाचे अध्यक्ष श्री. अरविंद रमेश प्रभू आणि सचिव डॉ. मोहन अनंत राणे सर यांचे नियमित सहकार्य आणि प्रशिक्षक सायली महाडीक आणि तुषार गितये यांचे मार्गदर्शन यांच्या जोरावर खेळाडूंनी इथपर्यंत मजल मारली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स