ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
मलेरिया आजारावर उपाय योजना व जनजागृतीसाठी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत नाबर शाळेचे यश...!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मलेरिया आजारावर उपाय योजना व जनजागृतीसाठी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत नाबर शाळेचे यश...!

प्रकाशन: 04 Jul 2022 04:08 PM
वाचन संख्या 125

बांदा | राकेश परब :
मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई संचलित व्ही. एन.नाबर मेमोरिअल इंग्लिश मिडियम स्कुल, बांदा येथे मेलेरिया I.E. आरोग्यवर्धिनी केंद्र बांदा नं .१ यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या मलेरिया आजाराबाबत उपाय योजना व जनजागृतीसाठी चित्रकला स्पर्धेत नाबर प्रशाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यामध्ये प्रथम क्रमांक कु.शुभम हनुमंत शिरोडकर, व्दितीय क्रमांक फाल्गुन महादेव नाईक, तुतिय क्रमांक अमृत तुळशीदास पेंडुरकर ,चतुर्थ क्रमांक हेरंब नितीन राणे यांनी यश मिळवले. स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना नुकतेच बक्षिस वितरण करण्यात आले. आरोग्यवर्धक केंद्र नं.१ च्या डाॅ.आरती देसाई यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. यावेळी आरोग्य सेवक दिपेश मेजारी,आरोग्य सेविका अनुज्ञा नाईक, अशंकालीन स्त्री परिचारिका वनिता धुरी, आशासेविका सावली कामत , सुधा बांदेकर, मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई, कला शिक्षक हर्षद खडपकर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स