मसुरेतील रस्त्यांच्या बनल्या नद्या....!
मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे मध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मसुरे येथील रस्ते रस्त्याला गटार नसल्यामुळे पाण्याखाली गेलेले आहेत. या सर्वांचा त्रास येथील ग्रामस्थ वाहन चालकांना शालेय विद्यार्थ्यांना होत आहे. विशेष करून मसुरे बाजारपेठ ते मसुरे पावणाई मंदिर या रस्त्यावरती एखाद्या छोट्या नदीचे स्वरूप आल्यासारखे वाटत आहे. येथील ग्रामस्थांची दोन्ही बाजूने गटारांची मागणी संबंधित सर्व विभागाकडे धुळखात पडली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये शासनाचा प्रचंड निधी खर्च करून हा रस्ता बनविण्यात आला होता परंतु अवघ्या एका महिन्यातच या रस्त्याला गटार नसल्यामुळे शासनाचा निधी पूर्णपणे पाण्या त गेला आहे. याबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)