इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लाच्या वतीने गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वितरण.
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : इनरव्हील क्लब आँप वेंगुर्ले च्या वतीने गोगटे मंगल कार्यालय वेतोरे येथे गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमांत गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये युवराज सुशांत राऊळ, किमया राजेश मळेकर, आयुष दत्ताराम राऊळ, अर्थव समीर सातार्डेकर, दिपीका सुरेन्र्द मेस्त्री, सार्थक रमेश करंकुटकर, चंद्रकांत प्रकाश अणसुरकर, संचिता बाळा राऊळ, सोहंम बाबु गावडे, झिलु सरमळकर, वाॅरन डिसोजा, दिक्षा वराडकर, मानसी राऊळ व निता सातार्डेकर इत्यादींचा सामावेश होता.
कार्यक्रमास क्लब अध्यक्ष सौ.ज्योती देसाई, सेक्रेटरी सौ.स्मिता दामले, उपाध्यक्ष सौ.अफशान कौरी, आय.एस.ओ.सौ.वॄंदा गवंडळकर, सदस्य सौ.श्रिया परब, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.स्मिता दामले यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ ज्योती देसाई यांनी केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)