कणकवलीत लायन्स नेत्र रुग्णालयाचा शुभारंभ…!
नेत्रचिकित्सेसाठी व उपचारांसाठी जिल्ह्यातील अद्ययावत सोयींनी सुसज्ज असे नेत्र रुग्णालय.
प्रख्यात डाॅक्टर बी.एस.म्हाडेश्वर यांच्या रेल्वे स्टेशन रोडवरील अश्विनी हाॅस्पिटल डायबेटिस केअर सेंटर येथे डाॅक्टर्स डे चे औचित्य साधून झाली नेत्रालयाची सुरवात.
कणकवली | प्रसन्ना पुजारे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण रुग्णांच्या सेवेसाठी डॉ. बी.एस.म्हाडेश्वर यांच्या अश्विनी हॉस्पिटल येथे दिनांक 1 जुलैला ‘नॅशनल डॉक्टर्स डे’ चे औचित्य साधून ‘लायन्स नेत्र रुग्णालय ‘ सुरू करण्यात आले.
या रुग्णालयात,रुग्णांसाठी अत्यंत आधुनीक व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नेत्रोपचार व चिकित्सेच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
लायन्स नेत्र रुग्णालय हे सर्व अद्ययावत सुविधा युक्त परिपूर्ण नेत्र रुग्णालय असून तिथे
प्रशिक्षित अनुभवी नेत्रतज्ञ व स्टाफ तैनात केलेला आहे.
अत्याधुनिक साधने व तंत्रज्ञान हे त्यांच्या दिमतीला असल्याने
सर्व प्रकारच्या दर्जेदार नेत्र शस्त्रक्रिया व नेत्रोपचार आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेसाठी उपलब्ध झाले आहेत. बिना टाका विना भुल फेको शस्त्रक्रिया ही देखील या उनचारांची वैशिष्ट्ये आहेत.
लायन्स नेत्र रुग्णालयात सुसज्ज वातानुकूलित ऑपरेशन थिएटरची देखील सोय करण्यात आली आहे.
शस्त्रक्रिया पूर्व सखोल तपासणी व्यवस्था,तिरळेपणा व बाल नेत्रोपचार,अचूक चष्मा नंबर व चष्मा वितरण केंद्र, उच्च रक्तदाब आणि मधुमेह तपासणी अशा नेत्र आरोग्याच्या सेवा लायन्स नेत्र रुग्णालय,कणकवली येथे आता उपलब्ध झाल्या आहेत.
लायन्स नेत्र रुग्णालयाचे संचालक, डॉक्टर्स, स्टाफ यांनी ही माहिती देत नेत्र आरोग्याची सेवा व जागर या दोन घटकांसाठी सिंधुदुर्ग वासियांना जागरुक रहायचे आवाहन केले आहे.
लायन्स नेत्र रुग्णालयाचे संपर्क क्रमांक 9422436363, असे सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले असून नेत्र आरोग्यासंदर्भात चिकित्सा व उपचारांसाठी या क्रमांकांशी संपर्क साधायचे आवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)