ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
<em>" स्वच्छ विद्यालय पुरस्कार "</em> <em>प्राप्त मदर तेरेसा स्कुलचा भाजपा वेंगुर्ले च्या वतीने सत्कार..!</em>
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

<em>" स्वच्छ विद्यालय पुरस्कार "</em> <em>प्राप्त मदर तेरेसा स्कुलचा भाजपा वेंगुर्ले च्या वतीने सत्कार..!</em>

प्रकाशन: 02 Jul 2022 03:55 PM
वाचन संख्या 70

विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट :
स्वच्छतेच्या बाबतीत देशपातळीवरील पुरस्कार मिळविलेल्या वेंगुर्ले नगरपरिषदेच्या हद्दीतील मदर तेरेसा स्कुलने वेंगुर्ले नगरपरिषदेच्या पावलांवर पाऊल ठेवून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांमधून स्वच्छ विद्यालय पुरस्कार मिळवला याबद्दल भाजपा वेंगुर्लेच्या वतीने वेंगुर्ले नगरपरिषदेचे स्वच्छतेचे ब्रँड अँबेसेडर प्रा.सुनील नांदोसकर यांच्या हस्ते फादर अँन्थोनी डिसोझा यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
वेंगुर्ले शहराला स्वच्छतेची परंपरा आहे. येथील नागरिक, मुले, शिक्षक यांना स्वच्छतेची आवड आहे, त्यामुळे वेंगुर्ले शहरातील शाळा व महाविद्यालय हे स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक असतात. गेल्या सात वर्षांमध्ये वेंगुर्ले नगरपरिषदेने स्वच्छतेचे राज्यस्तरीय व देशपातळीवरील पुरस्कार मिळवून एक स्वच्छतेचा ” वेंगुर्ले पॅटर्न ” बनवला, व त्याची स्फुर्ती घेऊन मदर तेरेसा स्कुलने स्वच्छतेचा पुरस्कार मिळवला या बद्दल नगराध्यक्ष राजन गीरप यांनी अभिनंदन केले.
यावेळी वेंगुर्ले नगरपरिषदेचे स्वच्छतेचे ब्रँड अँबेसेडर प्रा.सुनील नांदोसकर यांनी मदर तेरेसा स्कुलचे कौतुक करताना शाळेच्या परीसरासोबत, शाळेतील पाणी, शौचालये, हात धुण्याची सुविधा, देखभाल दुरुस्ती, कोवीड – १९ ची तयारी इत्यादी बाबतीत सर्व्हेक्षणात गुणांकण मिळवल्याबद्दल शालेय प्रशासनाचे तसेच विद्यार्थ्यांचे कौतुक केले. तसेच प्लास्टिकमुक्त व प्रदूषणमुक्त वेंगुर्ले शहर बनविण्यासाठी सर्वांनी कटीबद्ध होऊया असे आवाहन केले.
यावेळी उपनगराध्यक्षा शितल आंगचेकर यांनी मदर तेरेसा स्कुलने १० वी च्या परीक्षेमध्ये १००% यश मिळवल्याबद्दल अभिनंदन केले.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर, महिला तालुकाध्यक्षा स्मिता दामले, जि. का.का.सदस्य साईप्रसाद नाईक, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर, मच्छीमार सेलचे दादा केळुसकर, ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस, नगरसेवक प्रशांत आपटे, नगरसेविका श्रेया मयेकर व ईशा मोंडकर, महिला मोर्चाच्या वृंदा गवडंळकर, रसीका मठकर व आकांक्षा परब, ता.का.का.सदस्य रविंद्र शिरसाठ, अल्पसंख्याक सेलचे सायमन फर्नांडिस, बुथप्रमुख शेखर काणेकर, भुषण सारंग इत्यादी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स