ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
पुणे - देवगड एस.टी आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक ; ९ प्रवाशांना किरकोळ दुखापत..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

पुणे - देवगड एस.टी आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक ; ९ प्रवाशांना किरकोळ दुखापत..!

प्रकाशन: 24 Jun 2022 07:34 PM
वाचन संख्या 175

असलदे गावठण पिराजवळ आज शुक्रवार रोजी सायंकाळी ३.४५ वाजताची ही दुर्घटना..!

शिरगाव/ संतोष साळसकर :
कणकवली तालुक्यातील असलदे गावठण पिराजवळ आज सायंकाळी ३.४५ वाजण्याच्या सुमारास पुण्याहून देवगड कडे येणारी एस .टी आणि नांदगाव कडे जाणारा ट्रक यांच्यात भीषण टक्कर झाली. या अपघाताची भीषणता एवढी तीव्र होती की दोन्ही वाहनांचे खूप नुकसान झाले आहे. तर आतील सुमारे ९ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांना शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता आणण्यात आले त्यानंतर काही प्रवाशांना पुढील उपचाराकरिता कणकवली येथे पाठविण्यात आले.

Article image
Article image


पुणे – देवगड एस.टी आणि लिंगडाळ येथून कोल्हापूरच्या दिशेने चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रक यांच्यात असलदे येथे आज भीषण टक्कर झाल्याने एस.टी तील पुढील ९ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. त्यात कौशिक दीपक तळेकर ( वय – १६. दारोम), दीपक अर्जुन तळेकर ( वय – ५०, दारोम), बाळकृष्ण शांताराम चव्हाण ( वय – ५३ तोरसोळे), सीमा दीपक तळेकर ( वय – ३५ दारोम), रेश्मा रघुनाथ साटम ( वय – ५३, शिरगाव), रघुनाथ मारुती साटम ( वय -६०, शिरगाव), सिध्दी राजेंद्र मोंडकर ( वय – २१,देवगड), शैलजा प्रभाकर पवार ( वय – ५८, तोरसोळे), सूरज राजाराम कोयंडे ( वय – ४४, मळई- देवगड). आदी प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांना प्राथमिक उपचाराकरिता शिरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले.येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. वाय.एस. चव्हाण यांनी उपचार केले. त्यापैकी काही प्रवाशांना पुढील उपचाराकरिता कणकवली येथे पाठविण्यात आले.
या अपघाताची माहिती मिळताच असलदे सरपंच पंढरी वायंगणकर,प्रशांत तांबे,सुमेध तांबे यांनी मदतीसाठी धाव घेतली.या घटनेची माहिती मिळताच कणकवली चे पोलीस उपनिरीक्षक सागर खंडागळे,ठाणे अमलदार चंद्रकांत झोरे,श्री. गुरव यांनी घटनास्थळी पंचनामा केला. या अपघाताची माहिती मिळताच शिरगाव येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी मदतीसाठी धाव घेतली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स