मालवण नगरपरिषद कर्मचार्यांनी केली रुतलेली नौका पार..!
स्वच्छता पर्यवेक्षक प्रणव घोरपडे आणि मिथुन शिगले यांची तुफानी पावसातील कामगिरी..!
मालवण | सुयोग पंडित :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातील आचरेकर व्हाळी येथे पावसाळी पाणी निचरा होण्यास अडथळा होत असल्याची समस्या कळताच तत्काळ त्या जागेवर पोहचून आरोग्य विभागाचे स्वच्छता पर्यवेक्षक श्री. प्रणव घोरपडे – व सफाई कर्मचारी श्री. मिथुन शिगले यांनी स्वत: पाण्यात उतरून चिखलात रुतलेली होडी बाजूला करून व्हाळीतील पाण्याचा प्रवाह मोकळा केला. प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीमध्ये नगरपरिषद कर्मचा-यांकडून बजावल्या गेलेल्या या कामगिरीबद्दल नागरिकांकडून त्यांची प्रशंसा होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)