ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आमदार वैभव नाईक यांचे कणकवलीत जल्लोषी स्वागत…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आमदार वैभव नाईक यांचे कणकवलीत जल्लोषी स्वागत…!

प्रकाशन: 24 Jun 2022 04:57 PM
वाचन संख्या 106

मध्यवर्ती कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत रॅली…!

कणकवली | प्रतिनिधी : शिवसेनेचे अनेक आमदार बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या कळपात दाखल झाले आहेत. मात्र आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी आपली निष्ठा कायम ठेवली आहे. त्यामुळे आज कणकवली शहरात दाखल झालेल्या आमदार वैभव नाईक यांचे शिवसैनिकांकडून जल्लोषी स्वागत करण्यात आले. तसेच शिवसेना मध्यवर्ती कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत भव्य रॅली काढून शिवसैनिकाने शक्तिप्रदर्शन केले.
कणकवली शिवसेना कार्यालयात आलेल्या आमदार वैभव नाईक यांचे आज शेकडो शिवसैनिकांनी स्वागत केले. यावेळी भगव्या स्कार्फ व भगवे झेंडे याने वातावरण भगवेमय झाले होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण स्पिकर द्वारे लावून निष्ठावान शिवसैनिकांना साठी बाळासाहेब आदर्श होते. हे सांगितले जात होते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक निष्ठावान असल्याच्या भावना यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केल्या. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, जय भवानी जय शिवाजी, कोण आला रे कोण आला सेनेचा वाघ आला अशी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर, सतीश सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, नगरसेवक सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव, रामदास विखाळे, माजी नगरसेवक भूषण परूळेकर, युवासेना उपतालुका प्रमुख सचिन आचरेकर, नगरसेविका मानसी मुंज, बाळू मेस्त्री, कन्हैया पारकर, सचिन सावंत, राजू राठोड, रिमेश चव्हाण, तेजस राणे, सोहम वाळके, गोट्या कोळसुलकर, शंकर पार्सेकर, सरपंच प्रमोद कावले, अजित काणेकर, शहर प्रमुख शेखर राणे, निसार शेख, अनिल हलदिवे आदि बहुसंख्य शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत शिवसैनिकांनी रॅली काढली. छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार आमदार वैभव नाईक यांनी अर्पण करून अभिवादन केले. यावेळी वैभव नाईक यांनी गेलेले आमदार परत लवकर मागे येतील असा विश्वास व्यक्त केला. शिवसैनिकांनीही जल्लोष करत फटाक्यांची आतिषबाजी केली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स