फ्लोअर एक्सरसाईज मध्ये इशिता रेवाळेने पटकावले रौप्य पदक...!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :
प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुल, विलेपार्ले येथे प्रशिक्षण घेणारी इशिता सुनिल रेवाळे हिने नुकत्याच पार पडलेल्या हरियाणा येथील खेलो इंडिया युथ गेम्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत फ्लोअर एक्सरसाईज या क्रिडा प्रकारात रौप्य पदकाची कमाई करत वैयक्तीक आठवा क्रमांक मिळवत मुलींच्या महाराष्ट्र संघाला विजेतेपदाचा चषक मिळवण्यास हातभार लावला. कठीण आर्थिक परिस्थितीत वडिलांचे अथक परिश्रम व श्री. अरविंद प्रभू (अध्यक्ष), डॉ. मोहन राणे (सचिव), नीलम बाबरदेसाई (जिम्नॅस्टिक्स विभाग प्रमुख) यांच्या पाठिंब्यामुळे आणि प्रशिक्षक विशाल कटकदौंड व पूर्व प्रशिक्षक हरीष परब, विदेश दबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली यश मिळवल्या बद्दल इशिता वर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन.
मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचा ॲथलीट कु. सोहम चव्हाण याची विभागीय स्पर्धेच्या पात्रतेची 'उंच उडी...!'