वायंगणी येथे आत्मा अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण शिबीर संपन्न..!
चिंदर/विवेक परब :
आत्मा जिल्हा अंतर्गत आज आचरा मंडलचे शेती अवजारे दुरुस्ती, शेतकरी प्रशिक्षण शिबिर वायंगणी नाका येथे संपन्न झाले.
दिनेश लंबे यांनी कृषि यांत्रिकीकरण योजना शेतकऱ्यांना समजावून सांगितली तालुका कृषी अधिकारी व्हि. जी. गोसावी यांनी कृषी यांत्रिकीकरण व देखभाल दुरुस्तीचे प्रशिक्षण आयोजित केल्याचा उद्देश स्पष्ट केला व पाँवरविडर आणि पाँवर टिलरचे प्रशिक्षण दिले.
यावेळी आत्म्याचे अध्यक्ष उदय दुखंडे, वायंगणी सरपंच संजना रेडकर, तालुका कृषी अधिकारी गोसावी, कृषी सहाय्यक सुनिल कदम, अतुल लंबे, डि. डि गावडे, डि. के. सावंत, किशोर नरे, सुशिल कुमार शिंदे,अश्विन कुरकुटे, निलेश गोसावी व बहुसंख्य शेतकरी वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुशिलकुमार शिंदे यांनी तर आभार डि.के. सावंत यांनी मानले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)