ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सेवानिवृत्त ग्रामसेवक संघटनेने केले मालवण बिडिओंचे स्वागत..!

सेवानिवृत्त ग्रामसेवक संघटनेने केले मालवण बिडिओंचे स्वागत..!

प्रकाशन: 10 Jun 2022 04:20 PM
वाचन संख्या 41

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :

मालवण तालुका सेवानिवृत्त ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी‌ विस्तार अधिकारी संघटना यांच्या वतीने मालवण तालुक्यात नव्याने हजर झालेले गटविकास अधिकारी श्री आप्पासाहेब गुजर यांची तालुका अध्यक्ष श्री हनुमंत प्रभू यांनी भेट घेत पुष्पगुच्छ देऊन त्याचे स्वागत केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नूतन गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर हे गटविकास अधिकारी जे. पी. जाधव यांची बदली झाल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर सोमवारी रुजु झाले आहेत.
सोलापूर अकलूज हे मूळ गाव असलेले आप्पासाहेब गुजर यांनी कृषी अधिकारी म्हणून पुणे जिल्ह्यात बारामती दौंड येथे १८ वर्षे सेवा बजावली. त्यानंतर सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून मावळ, मुळशी, हवेली या पंचायत समिती ठिकाणी त्यांनी नऊ वर्षे कार्यभार पाहिला. त्यांची पदोन्नतीने मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी पदी बढती नियुक्ती देण्यात आली आहे.
यावेळी सचिव अशोक ओटवणेकर, कृषी अधिकारी गोसावी, के टी पाताडे आदी उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स