हळवल येथील युवकांचे कार्य कौतुकास्पद : संदेश पारकर
मिनी ट्रॅक्टर चालविण्याचा घेतला आनंद
कणकवली | उमेश परब : हळवल येथील शरद जाधव, सुमेध जाधव या मुलांनी मिनी ट्रॅक्टर बनविल्यानंतर अनेक स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे. अनेकांनी हा मिनी ट्रॅक्टर चालवून देखील पहिला आहे. हळवल येथील युवकांनी बनविलेला हा मिनी ट्रॅक्टर चालविण्याचा मोह शिवसेना नेते तथा माजी कोकण सिंचन उपाध्यक्ष संदेश पारकर यांना देखील आवरला नाही. हळवल येथे आयोजित एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या शिवसेना नेते सतीश सावंत आणि संदेश पारकर यांनी या मिनी ट्रॅक्टर ची पाहणी केली व युवकांचे कौतुकही केले. मात्र सर्व सामान्य जनतेसोबत सर्वसामान्य पणे वारवरणाऱ्या संदेश पारकर यांना हा मिनी ट्रॅक्टर चालविण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनी टेस्ट ड्राइव्ह देखील केली. मिनी ट्रॅक्टर ची पाहणी केल्यानंतर बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हटले जाते त्या प्रमाणेच या युवकांनी हे सुंदर यंत्र बनविले आहे. केवळ यावरच न थांबता यापेक्षा अजून नवनवीन तंत्र वापरून या मुलांनी प्रगती करावी असे प्रतिपादन संदेश पारकर यांनी यावेळी केले. तर हे कार्य खूप कौतुकास्पद असून इतर युवकांनी याचा आदर्श घ्यावा असेही ते यावेळी म्हणाले.
हळवल गावात आयोजित कार्यक्रमात हळवल शिवसेना शाखेच्या वतीने या युवकांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाबँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, नीलम पालव, बाळा भिसे, शैलेश भोगले, बंडू ठाकूर, संदेश पटेल, सचिन सावंत, रुपेश आमडोस्कर, राजू राणे, सुशांत दळवी, भास्कर राणे, मारुती सावंत, उत्तम राणे, माजी सरपंच स्मिता परब, गणेश राणे, अरुण राणे, रोहित राणे, विकास गुरव, सौरभ सावंत,अमोल परब दिलु राणे, आप्पा ठाकूर, प्रभाकर राणे आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)