ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
<em>भाजपा किसान मोर्चाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात १०० शिवार बैठका घेणार-उमेश सावंत (जिल्हा संयोजक - किसान मोर्चा, सिंधुदुर्ग</em>)
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>भाजपा किसान मोर्चाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात १०० शिवार बैठका घेणार-उमेश सावंत (जिल्हा संयोजक - किसान मोर्चा, सिंधुदुर्ग</em>)

प्रकाशन: 29 May 2022 10:10 PM
वाचन संख्या 50

चिंदर | विवेक परब :
पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या केंद्रातील सत्तेला आठ वर्षे पूर्ण झाली, ह्या आठ वर्षात देशातील शेतकरी वर्गासाठी अनेक योजना सुरू केल्या. म्हणुनच केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात १०० ठिकाणी शिवार बैठकांचे आयोजन केले आहे. या बैठकांमध्ये शेतकर्यांना केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यात येणार आहे.
किसान मोर्चाचे प्रदेश संयोजक वासुदेव नाना काळे यांच्या सूचनेनुसार सिंधुदुर्ग किसान मोर्चाची जिल्हा कार्यकारणी बैठक जिल्हा संयोजक उमेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी तालुका निहाय शिवार बैठकांचे नियोजन करण्यात आले.
या शिवार बैठकांचे वैशिष्ट्य म्हणजे, ह्या बैठका शेतकर्यांच्या बांधावर, आंबा – काजू बागायतदारांच्या बागेमध्ये, कुक्कुटपालन करणार्या पोल्ट्री परिसरामध्ये, फलोत्पादन करणार्या नर्सरीमध्ये, माड बागायतीमध्ये, कृषी पर्यटन करणारया पर्यटन संस्थेत, फळ प्रक्रिया उद्योगाच्या ठिकाणी शेतकर्याना एकत्रित करून या शिवार बैठका घेण्यात येणार आहेत.
पी.एम.किसान योजनेचा जास्तीत जास्त शेतकर्यांना लाभ मिळण्यासाठी, लाभार्थांना ओळख पडताळणी पुर्ण करण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. या मुदतवाढीचा फायदा सर्व सामान्य शेतकर्यांना मिळण्यासाठी किसान मोर्चाच्या माध्यमातून शेतकर्यांना मदत केली जाणार आहे .
” गाव तीथे – किसान मोर्चा ” या संघटनात्मक रचनेत प्रत्येक तालुक्यामध्ये किसान मोर्चाची बैठक आयोजित करण्यात येणार आहे. तसेच मंगळवार दिनांक ३१ मे रोजी सकाळी ११ वाजता प्रादेशिक फळ संशोधन केंद्र – वेंगुर्ले यांना मानाचा ” सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र ” पुरस्कार मिळाल्या बद्दल किसान मोर्चा – सिंधुदुर्गच्या वतीने सहयोगी संचालकांचा सत्कार समारंभ वेंगुर्ले येथे आयोजित केला आहे .
जिल्हा संयोजक उमेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यकारणी बैठकीस भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, किसान मोर्चा जि. सरचिटणीस गुरुनाथ पाटील – राजेश माळवदे – बाळु प्रभु , जिल्हा उपाध्यक्ष डाॅ. बी.डी.राणे – किशोर नरे , जिल्हा चिटणीस अजय सावंत, जिल्हा महिला संयोजक दिपा काळे, कुडाळ मंडल अध्यक्ष वामन राऊळ, ओरस मंडल अध्यक्ष सूर्यकांत नाईक, मालवण मंडल अध्यक्ष महेश श्रीकृष्ण सारंग, सावंतवाडी मंडल अध्यक्ष तुकाराम आमुणेकर, दोडामार्ग मंडल अध्यक्ष नारायण ठाकुर, मालवण उपाध्यक्ष प्रकाश राणे, मालवण सरचिटणीस दिगंबर जाधव , वैभव शेणई – कुडाळ इत्यादी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स