ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मनोज सोनवणे यांनी माणुसकी धर्म पाळला : कणकवली तहसीलदार रमेश पवार.

मनोज सोनवणे यांनी माणुसकी धर्म पाळला : कणकवली तहसीलदार रमेश पवार.

प्रकाशन: 02 Aug 2021 05:10 PM
वाचन संख्या 88

कणकवली / उमेश परब : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने अनेकांचे संसारसाहित्य होत्याचे नव्हते झाले. सिंधुदुर्गातही अतिवृष्टीमुळे हानी झालेल्या हातावर पोट असणाऱ्या गरजवंतांना अन्नधान्य देऊन सामाजिक कार्यकर्ते मनोज सोनवणे यांनी माणुसकीचा धर्म पाळला असल्याचे गौरवोद्गार कणकवली तहसीलदार रमेश पवार यांनी काढले. मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते मनोज सोनवणे यांच्या वतीने जुलै महिन्यात झालेल्या प्रलयकारी अतिवृष्टीबाधित कणकवली तालुक्यातील ओसरगाव कानसाळीवाडी येथील गरजू कुटुंबासाठी  जीवनावश्यक वस्तूंचे वाटप तहसीलदार रमेश पवार यांच्या हस्ते करण्यात आले. ओसरगाव कानसाळीवाडीत वडार , धनगर समाजातील हातावर पोट असणाऱ्या मजूर कामगारांची वस्ती आहे. चिरेखाणीवर काम करणारे, मोलमजुरी करणारे कामगार आपल्या कुटुंबकबिल्यासह येथे राहतात. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका या कामगारांच्या झोपडीवजा घरानाही बसला. त्यासोबतच अतिवृष्टीमुळे त्यांचा रोजगारही बुडाला. मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते मनोज सोनवणे यांनी अतिवृष्टीबाधित गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी दहिसर येथील मुख्याध्यापक तथा सामाजिक कार्यकर्ते दीपक गावडे यांच्याशी संपर्क साधला. दीपक गावडे यांनी याबाबत पत्रकार राजन चव्हाण यांना  कल्पना दिली. पत्रकार राजन चव्हाण यांनी मनोज सोनवणे , दीपक गावडे यांच्या वतीने तहसीलदार रमेश पवार यांच्या हस्ते  ओसरगाव कानसाळीवाडी येथील http://localhost/news/public/uploads/20 कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले. यासाठी ओसरगाव माजी उपसरपंच चंद्रहास उर्फ बबली राणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स