ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
चिंदर ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम यांचा कृषिदिनी डाँ निलेश राणे यांच्या हस्ते सत्कार

चिंदर ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम यांचा कृषिदिनी डाँ निलेश राणे यांच्या हस्ते सत्कार

प्रकाशन: 02 Aug 2021 02:30 PM
वाचन संख्या 76

सेवानिवृत्त विस्तार अधिकारी अकुंश मुणगेकर यांच्या तर्फे दिला जाणारा उपक्रमशील ग्रामविकास अधिकारी म्हणून मालवण तालुक्यात व्दितिय क्रमांक

मालवण|विवेक परब : चिंदर ग्रामविकास अधिकारी प्रकाश कदम यांचा मालवण पंचायत समितीच्यावतीने कृषिदिना निमित्त कृषी विभागाच्या विविध योजना उत्कृष्ट प्रकारे राबवील्या बद्दल माजी खासदार डाँ नीलेशजी राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  चिंदर येथे गेली पाच वर्षे ग्रामविकास अधिकारी म्हणून काम करणारे प्रकाश कदम मागील पाच वर्षांपासून चिंदर गावांमध्ये विविध उपक्रम राबवुन चांगली सेवा देत आहेत सन २०१६ यापासून बायोगॅसमध्ये उत्कृष्ट काम करून गावामध्ये पंचावन्न बायोगॅस बांधून पूर्ण केले आहेत. मागील पाच वर्षांमध्ये तालुक्यात सर्वाधिक बायोगॅस  चिंदर गावामध्ये बांधण्यात आले आहेत तसेच महात्मा गांधी   राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून चिंदर गावामध्ये काजू लागवड, बांबू लागवड, गांडूळ युनिट, गोठा बांधणे इत्यादी कामे करून शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. 
            सन २०२१-२२ मध्ये कृषी विभागाच्या विविध योजना चांगल्या प्रकारे राबविल्यामुळे यावर्षी सेवानिवृत्त विस्तार अधिकारी श्री अंकुश मुणगेकर यांच्या तर्फे दिला जाणारा उपक्रमशील ग्रामविकास अधिकारी म्हणून जाहीर केलेल्या पुरस्कारामध्ये चिंदर ग्रामविकास अधिकारी पी जी कदम यांनी दुसरा क्रमांक प्राप्त करून रक्कम रुपये तीन हजारांचे बक्षीस मिळविले आहे.  या पुरस्कारासाठी गावांमध्ये राबविण्यात आलेल्या बायोगॅस, फळबाग लागवड, बांबू लागवड, गांडूळ युनिट, शेतकरी मासिक,  वनराई व कच्चे बंधारे व कृषी विभागाच्या संलग्न योजनांचा विचार करण्यात आला. कार्यक्रमासाठी माननीय गटविकास अधिकारी, सभापती  उपसभापती कृषी अधिकारी, पदाधिकारी हजर होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 290

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स