<em>चित्रकला स्पर्धेत साईशा लाडगावकर व तनिष्का शिंगरे तर हस्ताक्षर स्पर्धेत वेदिका शिंदे प्रथम..!</em>
शिरगाव | संतोष साळसकर :
देवगड तालुक्यातील साळशी-सरमळेवाडी येथे श्री सत्यनारायण महापूजा निमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत शिशु गटात साईशा लाडगावकर व बाल गटात तनिष्का शिंगरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
सुखशांती मंडळ साळशी-सरमळेवाडी व ग्रामस्थांच्या वतीने श्री सत्यनारायण महापूजा निमित्त ‘मुक्तांगण’ या कार्यक्रमांतर्गत मुलांच्या चित्रकला आणि हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आल्या.
यावेळी चित्रकला स्पर्धेत शिशु गटात साईशा लाडगावकर प्रथम क्रमांक, सामवेद लाड द्वितीय क्रमांक, सेजल रावले आणि सारा रावले तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला तसेच बाल गटात तनिष्का शिगंरे प्रथम क्रमांक श्रेया परब द्वितीय क्रमांक आर्यन बोडवे तृतीय क्रमांक मिळाला तसेच कुमार गटात आदिश फाटक प्रथम क्रमांक ऋग्वेद साटम द्वितीय क्रमांक सुयश रावले तृतीय क्रमांक मिळाला.
सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत बाल गटात वेदिका शिंदे प्रथम क्रमांक आर्यन बोडवे द्वितीय क्रमांक विघ्नेश सावंत तृतीय क्रमांक मिळाला तसेच कुमार गटात रिध्दी रावले प्रथम क्रमांक ऋग्वेद साटम द्वितीय क्रमांक आदिश फाटक तृतीय क्रमांक मिळाला.
या सर्व विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
तसेच महिलांसाठी संगीत खुर्ची व हळदी-कुंकू कार्यक्रम घेण्यात आला
सकाळ सत्रात नव्याने बांधण्यात आलेल्या श्री सत्यनारायण सभागृहाचे उद्घाटन शांताराम रावले यांच्या हस्ते करण्यात आले .या सभागृहासाठी रावले कुटुंबीयांनी आपल्या सामाईक जमिनीतील जागा विनामूल्य दिली आहे.
रात्री हिदंळे (राणे वाडी) येथील रंग नटराज दिंडी ग्रुप याचे वारकरी दिंडी भजनाचा कार्यक्रम झाला .
यावेळी सुखशांती मंडळाचे सर्व आजी माजी पदाधिकारी ग्रामस्थ महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)