ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
<em>तरुणांनो स्वतः चे उद्योग निर्माण करून प्रगती करण्याचा संकल्प करा…!</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>तरुणांनो स्वतः चे उद्योग निर्माण करून प्रगती करण्याचा संकल्प करा…!</em>

प्रकाशन: 21 May 2022 08:13 PM
वाचन संख्या 104

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांचे आवाहन.

सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सव २०२२ चे कणकवलीत उद्घाटन…

२३ मे पर्यत चालणार हा महोत्सव..!

कणकवली | बंटी राणे :

” चांगले आणि सुखवस्तू जीवन जगायचे असेल तर उद्योग-व्यवसाय करा.स्वतःचे उद्योग निर्माण करून प्रगती करण्याचा संकल्प करा.नोकरीच्या मागे लागू नका तरुण- तरुणींना उद्योजक म्हणून उभे करण्यासाठी , माझ्या एम.एस.एम.ई खात्याच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.फक्त आत्मविश्वासाने पुढे या. कामात चिकाटी ठेवा, जिद्दीने उभे राहा मी तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य करेन” असा विश्वास केंद्रीय सूक्ष्म,लघु,मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी
कणकवली येथे दिला. एम.एस.एम.ई.आयोजित सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सव २०२२ चे शानदार उद्घाटन भारत सरकारच्या सूक्ष्म,लघु,मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.

Article image


श्री. नारायण राणे म्हणाले,”सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माझा तरुण उद्योजक व्हावा ही माझी इच्छा आहे. उद्योग क्षेत्रात प्रगती अथांग आहे.त्याचा फायदा घ्या.आसाम मधून येणारे उद्योजक गवता पासून सेंट आणि विविध अत्तर बनवित आहेत तर केरळ मधील लोक नारळाच्या किशी पासून वस्तू बनतात त्याच प्रमाणे त्या किशी पासून प्लायवूड सुद्धा बनवतात आणि परदेशात पाठवतात. देशातील सर्वात मोठे उद्योजक धीरूभाई अंबानी हे १५०० रुपयांचे भांडवल घेऊन उदयोग सुरू केला आणि मृत्यु समयी हीच धीरूभाई ची रिलायन्स कंपनी ६३ हजर कोटींची उलाढाल करत होती.त्यांचा आदर्श घ्या.”
यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७२ अधिकारी आणले.२०० कोटीचे आधुनिक टेक्नॉलॉजी असलेले उद्योग प्रशिक्षण केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मी मंजूर केले आहेत असेही त्यांनी सांगितले.
नोकरी हवी मग ती शिपाई पदाची असली तरी चालेल ही मानसिकता सोडा.डाळ,पिठी भात खाऊन समाधान मानू नका.देशात करोडो रुपयांची उलाढाल होते त्यात उद्योग क्षेत्रात तुम्ही कधीतरी असणार आहेत की नाही ? असा सवाल यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी युवकांना केला.कोकणी, मराठी माणसाने आत्मविश्वास बाळगावा, १५ ते २० करोड रुपयांचा आपला उद्योग असावा अशी जिद्द बाळगावी.आपल्या येथे गरे, आंबा,कोकम आहेत त्यावर काय प्रक्रिया करून शकता हे ठरवा. छत्रपती शिवाजीराजे यांच्या विचारातून तयार झालेला माणूस हवा.त्यांचा वारसा सांगता तर नवीन निर्मिती करण्याची क्षमता ठेवा.
मी राजकारणात आलो तेव्हा सिंधुदुर्ग जिल्हा मागासलेला होता.मात्र त्याचा दरडोई उत्पादन वाढविला.आज रस्ते,पाणी,वीज अशा व्यवस्था केल्या. इंजिनिअरिंग कॉलेजे,मेडिकल कॉलेज उभे केले अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या विरोधकांनी काय केले ते सांगावे असा सवालही त्यांनी केला. मी केंद्राचा मंत्री आहे. मी कधी जात,धर्म,आणि पक्ष पाहिला नाही.प्रत्येकाला मदत केली आणि करत राहणार.असेही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स