ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
'शहीद मेजर कौस्तुभ रावराणे' यांच्या स्मरणार्थ, गृहप्रवेशाचे औचित्य साधून आयोजित केलेले रक्तदान शिबिर सर्वत्र ठरतेय लक्षवेधी.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

'शहीद मेजर कौस्तुभ रावराणे' यांच्या स्मरणार्थ, गृहप्रवेशाचे औचित्य साधून आयोजित केलेले रक्तदान शिबिर सर्वत्र ठरतेय लक्षवेधी.

प्रकाशन: 21 May 2022 08:59 PM
वाचन संख्या 63

ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांच्या सहित २१ जणांनी केले रक्तदान..

वैभववाडी प्रतिनिधी : “प्रेरणादायी आदर्श तू अदम्य तुझ्या साहसाने।। कौतुक दाटे नयनांमध्ये। उन्नत माथा अभिमानाने।।” शहीद मेजर शहीद कौस्तुभ राणे यांच्या सडूरे- गावठणवाडी येथे घराच्या गृहप्रवेशानिमित्त आज शनिवार दि.२१ मे २०२२ रोजी रावराणे बंधु तसेच त्यांचा मित्रपरिवार आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग शाखा – वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सडुरे, गावठणवाडी ता. वैभववाडी येथे रक्तदान शिबिर पार पडले. यावेळी या रक्तदान शिबिरामध्ये २१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.गृहप्रवेशादिवशी शहीद मेजर कौस्तुभ राणे यांची आठवण सर्वाना सदैव राहावी.यासाठी त्यांच्या स्मरणार्थ रक्तदान करणाऱ्यां रक्तदात्यांना यावेळी “स्मृती चषक” देण्यात आला.

Article image
Article image


यावेळी शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या कुटुंबातील सदस्य,ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे, गावचे नागरिक तसेच सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे वैभववाडी तालुकाध्यक्ष राजेश पडवळ व रक्तदाते उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स