ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
<em>भेटवस्तु देताना पुस्तक द्या- माधुरी आठल्ये.</em>
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

<em>भेटवस्तु देताना पुस्तक द्या- माधुरी आठल्ये.</em>

प्रकाशन: 21 May 2022 02:19 PM
वाचन संख्या 76

आजगाव साहित्य कट्ट्याची एकोणीसावी सभा संपन्न..!

चिंदर | विवेक परब :

“बालपणापासून जोपासलेला पुस्तक वाचनाचा छंद आणि नोकरीला लागल्यावर त्याला दिलेली पुस्तक संग्रह करण्याची जोड आजही अव्याहतपणे सुरू आहे.अजून दहा वर्षे हे करण्याची इच्छा असून नंतर जीवापाड जपलेली ही पुस्तकं चांगल्या संस्थेला भेट देईन. मूळात ‘माझं वाचन हेच माझं जीवन’ असून त्यासाठी मला कधी कोणतीही तडजोड करावी लागली नाही. माहेरी लावलेलं हे पुस्तक वाचनाचं रोपटं सासरीही चांगलं बहरलं.” आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्यावर प्रमुख अतिथी माधुरी आठल्ये बोलत होत्या. निमित्त होते कट्ट्याच्या एकोणीसाव्या सभेचे.
सुरुवातीला विनय सौदागर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचा परिचय करून दिला. त्यानंतर कट्ट्याचे ज्येष्ठ सदस्य विनय फाटक यांचे हस्ते श्रीफळ व पुस्तक भेट देऊन सौ. आठल्ये यांचा उचित सन्मान करण्यात आला. सौ.आठल्ये पुढे म्हणाल्या,”प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी मला पुस्तक वाचनाची गोडी लावली. नंतर माझे काका अत्रेभक्त अनंत काकतकर यांनी परिसरातील वाचनालयात माझे नाव नोंदवून त्याला बळ दिले. लग्नानंतर विस्कळीत झालेले वाचन पुन्हा त्यांच्याच प्रेरणेने सुरू झाले. या वेळी पुस्तक खरेदीची त्याला जोड दिली गेली. पुस्तक विकत घेतल्याने ते पुन्हा पुन्हा चवीने वाचता येते. “
‘भेटवस्तू देताना नेहमी पुस्तक द्यावे. मुलांना खाऊ किंवा खेळणी द्यायच्या अगोदर पुस्तक वाचण्याची लटकी सक्ती करावी. डाॅक्टरांच्या क्लिनिक मध्ये लहान मुलांसाठी आकर्षक पुस्तके,लहान मुलांसाठीची मासिके असावीत’, असेही त्यांनी सुचवले.
नंतर झालेल्या चर्चेत महेश बोवलेकर, सोमा गावडे,सूर्यकांत आडारकर, विनायक उमर्ये आदीनी भाग घेतला. वाचनात अनुवादित पुस्तकांचे महत्त्व काय?,आपल्या संग्रहात आध्यात्मिक पुस्तकांचे स्थान काय?,पुस्तकात रमल्याने आपल्याला समाजापासून दूर जाण्याचा धोका वाटत नाही काय?,आपली अत्यंत जवळची पुस्तके कोणती? असे अनेक प्रश्न त्यांना विचारण्यात आले. त्यांची त्यांनी समर्पक उत्तरे दिली.
सभेला आशा जोशी, सुमन मुंडले, प्रसन्ना साधले, शुभम् साधले, अंकिता वाडकर, कवी विशाल उगवेकर, एकनाथ शेटकर, मीरा आपटे आणि अनिता सौदागर असे साहित्य प्रेमी उपस्थित होते.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विनय सौदागर यानी केले.आजगाव वाचनालयात पार पडलेल्या पाऊस असूनही या सभेस साहित्यप्रेमींची उपस्थिती लक्षणीय होती.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन.

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आर...

14 Sep 2026 279
श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा.

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नि...

14 Sep 2026 175

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स