ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आमदार नितेश राणे यांनी नांदगाव येथे सर्व्हिस रोडला भेट देत केली प्रत्यक्ष पाहणी…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आमदार नितेश राणे यांनी नांदगाव येथे सर्व्हिस रोडला भेट देत केली प्रत्यक्ष पाहणी…!

प्रकाशन: 19 May 2022 09:12 PM
वाचन संख्या 54

कणकवली | प्रतिनिधी : नांदगाव तिठा येथील सर्व्हिस रोडचे काम अर्धवट ठेवून महामार्ग प्राधिकरणाने प्रवाशांना मृत्यूचे आमंत्रण दिले आहे.यासंदर्भात भाजपा आमदार नितेश राणे यांनी आज नांदगाव येथे भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली.

Article image


काल दुपारी कणकवली प्रांत कार्यालय येथे आमदार नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली होती व नांदगाव तिठा येथील प्रलंबित कामांबाबत चर्चा करुन आज प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जाहीर केले होते.
या पार्श्वभूमीवर आज सकाळी 10.00 वाजता नांदगाव येथे आम.नितेश राणे यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.
यावेळी हायवे अधिकार्यांना ज्या काही मागण्या नांदगाव वासियांच्या आहेत त्या तातडीने मार्गी लावा.छोट्या छोट्या समस्या सोडविण्यासाठी दिरंगाई नको त्या तातडीने मार्गी लावा .अशा सुचना आमदार नितेश राणें यांनी संबंधित अधिकार्यांना दिल्या आहेत.
यावेळी महामार्ग प्राधिकरण चे कनिष्ठ अभियंता श्री. जाधव,केसीसी चे पांडे,उप अभियंता श्री कुमावत,केसीसी ठेकेदार कंपनी अधिकारी, पोलिस उपनिरीक्षक श्री हुलावले,इंकपाळ ,बावधाने तसेच भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर, असलदे सरपंच पंढरी वायंगणकर,असलदे उपसरपंच संतोष परब, भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख भाई मोरजकर, कमलेश पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, भुषण म्हसकर ,भुपेश मोरजकर, आदी उपस्थित होते.
भेट देऊन कोणी कोणती कामे करावयाची आणि पावसाळ्या पूर्वी कोणती कामे तातडीने पूर्ण करायची याबाबतच्या सूचना आमदार नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांना प्रत्यक्षच दिल्या आहेत .
तसेच हायवे संदर्भात गतिरोधक बसविण्याची मागणी नसताना गतिरोधक का बसविण्यात आले. याबाबत कोणी लेखी मागणी केली आहे ती आम्हाला दाखवा उगाच आमच्या नावाची बदनामी करु नका अशी आक्रमक भूमिका असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांनी व्यक्त केली यावर अधिकारी वर्ग निरुत्तर झाले होते.
नांदगाव ब्रिज शेजारून जाणारा सर्विस रोड पूर्ण होत नाही तोपर्यंत श्री देव कोळंबा येथे मिडलकट ठेवून पर्यायी मार्ग द्यावा. ही मागणी तात्काळ करण्यात यावी अशा सूचना आमदार नितेश राणे यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स