<em>निलेश कदम यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बांद्यातील अंगणवाडींना शैक्षणिक साहित्य वाटप करत वेगळा उपक्रम…!</em>
बांदा | राकेश परब : बांदा गावातील युवा नेतृत्व व सामाजिक कार्यकर्ते निलेश कदम यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने बांदा येथील अंगणवाडीना शैक्षणिक साहित्य भेट दिले. गेली दोन वर्षे निलेश कदम हे आपल्या वाढदिवसाला अशा प्रकारे साहित्य वाटप करत वाढदिवस साजरा करत आहेत.
यावर्षी सुद्धा त्यांनी बांदा शहरातील ९ अंगणवाडीना शैक्षणिक साहित्य वाटप केले.तसेच शहरातील आशा स्वयंसेविकांनाही साहित्य वाटप केले.
यावेळी बांदा सरपंच अक्रम खान, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.जगदीश पाटील,डॉ.मयुरेश पटवर्धन, बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे, बांदा तलाठी वर्षा नाडकर्णी, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर,राजाराम उर्फ बाळू सावंत,सुशांत पांगम,राकेश केसरकर,ज्ञानेश्वर सावंत,रत्नाकर आगलावे,ऋषी हरमलकर,ऋषीकेश देसाई,निलेश मोरजकर,शानु नाईक,नेमळे सरपंच विनोद राऊळ, आदी उपस्थित होते.
निलेश कदम यांनी या वर्षी देखील सामाजिक बांधिलकी जपत आपला वाढदिवस सादरा केला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)