ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
अक्कलकोट भूषण नंदकुमार पेडणेकर यांचा कोकण कट्टा पुरस्कार सोहळ्यात झाला सन्मान…!

अक्कलकोट भूषण नंदकुमार पेडणेकर यांचा कोकण कट्टा पुरस्कार सोहळ्यात झाला सन्मान…!

प्रकाशन: 16 May 2022 06:16 PM
वाचन संख्या 38

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालीत श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगडचे संस्थापक विश्वस्त श्री नंदकुमार तुकाराम पेडणेकर यांचा विशेष सत्कार
संगीतकार गायक श्री श्रीधर सुधीर फडके यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आला. अनेक लोकांना स्वामी भक्ती मध्ये प्रेरित करण्याचे महत्वाचे काम करत असल्या बद्दल नंदकुमार पेडणेकर याना नुकताच ‘अक्कलकोट भूषण’ हा पुरस्कार अक्कलकोट येथे प्रदान करण्यात आला होता. त्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करत अभिनंदन करण्यात आले.

Article image
Article image


‘बाबुजी आणि मी ‘ हा संगीतकार गायक श्रीधर सुधीर फडके यांचा सुमधुर गायनाचा कार्यक्रम दीनानाथ नाट्यगृह विलेपार्ले येथे झाला. श्री. गोटया सावंत यांच्या सहकार्याने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सदर सत्कार करण्यात आला. स्वर्गीय संगीतकार बाबूजी अर्थातच श्री सुधीर फडके यांच्या संगीतबद्ध गाण्यांचा आस्वाद या समयी उपस्थितीतांना अनुभवता आला. कोकण कट्टा या सेवाभावी संस्थेच्या विशेष सहकार्याने आणि प्रायोजक संभव ग्रुप व मंगल रॉयल ज्वेलस प्रा. ली व कौतंय प्रतिष्ठान यांचे सहकार्य लाभले. यावेळी स्वामी सेवेतील मान्यवरांना गौरविण्यात आले

कोकण कट्टा सन्मान २०२२ चे मानकरी खालील प्रमाणे आहेत.
श्री स्वामी समर्थ मठ विलेपार्लेचे विश्वस्त श्री विनय कंटक,
बालप्रेमी श्री विजय जाधव , स्वामी सेवेचा वसा घेतलेले श्री माधव श. भाटकी,सामाजिक सेवा कार्यक्षेत्र कार्यरत कौंतेय प्रतिष्ठानचे संस्थपाक, अध्यक्ष श्री.कौंतेय देशपांडे, स्वामी सेवेचा वसा घेतलेल्या आणि श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथील मठाच्या बांधकाम निधीसाठी मोलाचे योगदान देणा-या सौ. निलम नंदकुमार पेडणेकर,सामाजिक सेवा कार्यक्षेत्र काम करणाऱ्या सौ. नम्रता लवू साळुंखे, यांना या प्रसंगी श्रीफळ, शाल, सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
सदर कार्यकमास चित्रपट अभिनेते श्री अनिल गवस यांची विशेष उपस्थिती लाभली होती. कार्यक्रम आयोजन यशस्वी करण्यासाठी श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालीत श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगडचे संस्थापक विश्वस्त स्वामी भक्त नंदकुमार तुकाराम पेडणेकर यांनी परिश्रम घेतले.
यावेळी रत्नागिरी माजी सभापती दत्ताजी कदम, कोकण कट्टा सदस्य दादा गावडे, सुजीत कदम, हर्षल धराधर, दया मांडवकर,य मनोज शेलार, कमलेश रासम उपस्थित होते.
कोकण कट्टा चे संस्थापक विश्वस्त आधारस्तंभ श्री अजीत पीतळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स