ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवण नगरपरिषद पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन ठरले जल्लोषाचे नवसंजीवन..!

मालवण नगरपरिषद पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन ठरले जल्लोषाचे नवसंजीवन..!

प्रकाशन: 13 May 2022 11:29 PM
वाचन संख्या 316

आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून व मुख्याधिकारी यांच्या प्रशासकीय सकारातून साकार झालेल्या मालवण नगरपरिषद पर्यटन महोत्सव ‘जल्लोष http://localhost/news/public/uploads/2022’ चा वैभवशाली शुभारंभ.

ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर व दिगंबर नाईक यांची उद्घाटन कार्यक्रमाला विशेष उपस्थिती.

किल्ले सिंधुदुर्ग आणि ‘समुद्र कृतज्ञ मालवणकरांचे’ दैवत श्री देव दांडेश्वर स्थान,श्री मोरयाचा धोंडा असे स्थान महात्म्य लाभलेल्या दांडी किनारी नगरपरिषद पर्यटन महोत्सवाचा जल्लोषात शुभारंभ .

मालवण | सुयोग पंडित : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून साकार होणार्या ‘मालवण नगरपरिषद पर्यटन महोत्सव http://localhost/news/public/uploads/2022’ चा, आज सायंकाळी दांडी बिचवर शानदार उद्घाटन सोहळ्याद्वारा शुभारंभ झाला.

या शानदार सायंकाळी मंचावर कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक, मालवणचे तहसीलदार श्री.अजय पाटणे,नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष जिरगे, मालवण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर , युवा नेते संदेश पारकर, सिंधुरत्न कलामंचचे अध्यक्ष व ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर,अभिनेते दिगंबर नाईक, सारस्वत बॅंकेच्या सामंत,जिल्हा नियोजन अधिकारी श्री पवार, जिल्हा बॅन्क संचालक मेघनाद धुरी, माजी जि प सदस्य हरी खोबरेकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण पत्रकार, वृत्तनिवेदक व मिडिया आयकाॅन ॠषी देसाई हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक होते.

आमदार वैभव नाईक,तहसीलदार अजय पाटणे ,मुख्याधिकारी संतोष जिरगे ,माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर व मंचावरील इतर सर्व मान्यवरांच्या हस्ते ‘आम्रतरुला’ तथा आंब्याच्या रोपट्याला पाणी देऊन या कार्यक्रमाचे उद्गाटन करण्यात आले.

मान्यवर व सर्व उपस्थितांच्या स्वागतानंतर मंचावर उपस्थित मान्यवरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले .


नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून जाहीर झालेल्या या नगरपरिषद पर्यटन महोत्सव जल्लोष http://localhost/news/public/uploads/2022 चा जलद प्रवास कथन केला केवळ दहा दिवसात या सोहळ्याला साकार करताना आलेले अनुभव सांगितले व सहकार्य झालेल्या सर्व घटकांचे त्यांनी आभार मानले. कणकवली देवगडचे आमदार नितेश राणे व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही या महोत्सवातील भरगच्च कार्यक्रम व उपक्रमांच्या आयोजनाची रुपरेषा आवडल्याचे व त्यांनी आयोजनाची प्रशंसा केल्याचे त्यांनी नमूद केले.

मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी त्यांच्या मनोगतात प्रशासकीय कालखंड असूनही शहरातील सर्व अत्यावश्यक विकासकामे आणि सोबतच या पर्यटन महोत्सवातून सर्व मालवणवासियांना चैतन्य देताना त्यांना व नगरपरिषदच्या त्यांच्या सर्व नगरसेवक सहकार्यांना आमदार वैभव नाईक यांनी विशेष लोकसेवेचे एक वेगळे सामाजिक व सांस्कृतिक दालन दिल्याचे नमूद केले.

युवा तडफदार नेते संदेश पारकर यांनी त्यांच्या थेट व हलक्या फुलक्या शैलीत मालवण वासियांचा उत्साह, आमदार वैभव नाईक आणि मालवणचे नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या विशेष प्रयत्नांची प्रशंसा केली.

ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी कोकणातील या दांडी बिच महोत्सवाच्या उद्गाटनाला यायचे भाग्य मिळाले म्हणून समस्त मालवणवासिय व आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले.
ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी कोकणातील कला व कोकणच्या समृद्धतेचा स्थानिकांनी सर्वतोपरी उचित् वापर करावा असा संदेश दिला.
मार्मिक अभिनेते दिगंबर नाईक यांनी आमदार वैभव नाईक व मालवण नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्यासह माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर व सहकार्यांचे कौतुक करताना समस्त मालवणवासियांना या कार्यक्रमात कोणताच पक्षीय व तात्विक भेदभाव न राखता मनापासून कोकणचा व मालवणचा आनंद म्हणून पहायचे जाहीर आवाहन केले. दिगंबर नाईक यांनी मालवणी भाषेतून घातलेले गार्हाणे घालून महोत्सव उत्साहपूर्ण व जल्लोषात साजरा व्हावा अशी सदिच्छा व्यक्त केली.

आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या भाषणात या महोत्सवाची घोषणा व त्यानंतरचा कालखंड यांवर प्रकाश टाकताना पालकमंत्री उदय सामंत व पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. आपल्या पक्षातील पदाधिकारी,नेते,कार्यकर्ते यांच्या सह या सोहळ्याला व महोत्सवाला सहकार्य केलेल्या व्यक्तिंचा त्यांनी विशेष उल्लेख करत आभार मानले. पाच दिवसाचा हा सोहळा चैतन्यमय वातावरणात साजरा होत आहे व त्यासाठी स्थानिक मालवणवासीय व दांडीवरील प्रत्येक नागरिकाने दिलेले योगदान व सहकार्य संपूर्ण जिल्ह्यातील व मालवणमधील सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांसाठी एक आदर्श असे उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.

उपस्थित सर्वांना आयोजक व नगरपरिषदेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
कोरोना काळात नगरपरिषद व सामान्य नागरीक यांच्यातील महत्वपूर्ण दुवा बनत प्रसार माध्यमातून उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल मालवणचे वार्ताहर व पत्रकार अमित खोत यांचा या उद्घाटन सोहळ्यात स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन विशेष गौरव करण्यात आला.

इव्हेंट आयोजनातील तज्ञ प्रणय तेली, कंटेंट रायटर मयुर खानोलकर , मालवण नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी वृंद , आमदार वैभव नाईक यांचे स्वीय सहाय्यक नितीन राऊळ ,अनंत पाटकर, यांच्यासह या सोहळ्याला मालवणचे माजी बांधकाम सभापती व नगरसेवक यतीन खोत, माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती मंदार केणी,माजी नगरसेवक पंकज सादये, माजी नगरसेवक नितीन वाळके, शहर युवा नेते मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, उमेश मांजरेकर,नरेश हुले,पृथ्वीराज जोगी, किसन मांजरेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.
श्री अन्वय प्रभू व इतर स्थानिक आयोजन स्वयंसेवकांचीही इथे विशेष उपस्थिती होती.
सर्व क्षेत्रातील सेलिब्रेटिज , सामान्य मालवण शहरवासीय व तालुक्यातील नागरिकांची महोत्सवाकडे गर्दी वाढतच चालल्याचे चित्र उद्घाटन सोहोळ्यादरम्यान अनुभवता येत होते.

या उद्घाटन कार्यक्रमातील एका मनोगतामध्ये नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी स्वतःतील प्रशासकाला बाजुला ठेवत एक विधान केले. आपण काहीशा अनिच्छेनेच कोकणात व मालवणात सेवा कर्तव्यासाठी आलेलो परंतु आल्यानंतर आपल्याला कोकण,सिंधुदुर्ग जिल्हा व विशेषकरुन मालवण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष, नगरसेवक व सामान्य नागरीकांनी जे अविश्वसनीय निकाल दिले ते पाहून निसर्गरम्य मालवणला सेवा बजावणे हे एक भाग्य असल्याचे उत्स्फूर्त उद्गार काढले.
उपस्थित रसिकांनी व प्रेक्षकांनी कोरोना काळानंतर आमदार वैभव नाईक व सहकार्यांनी संकल्पना,विकास व पूर्ततेचा चालू केलेला झपाटा राजकारणाला छेद देत विकासकामे करायचा एक आदर्श असल्याची प्रतिक्रिया दिली.

सूत्रसंचालक व छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र भूषण ॠषी देसाई यांनी ‘प्रशासक म्हणजे विकास कामांना टाळे’ या संकल्पनेला बदलून प्रशासकाची एक नविन व्याख्याच नगरपरिषद मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी सर्वांना कृतीने दाखवल्याचे सांगितले. आमदार वैभव नाईक यांच्या अथक परंतु रचनात्मक तळमळीबद्दल सामान्य स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये व युवा पदाधिकारी यांच्यामध्ये त्यांनी फुंकलेला जनतेच्या विकासासाठी झटायचा प्राणवायू हा युवा व स्थानिक बहुपक्षीय लोकप्रतिनिधींचाही सध्या चर्चेचा विषय आहे. जिल्हा नियोजन व नगरपरिषद माध्यमातून अत्यंत नाममात्र कालावधीत पर्यटन महोत्सव ही संकल्पना राबविण्याचे एक अविश्वसनीय काम आमदार वैभव नाईक यांनी केले आहे असे मत अनेक राजकीय व सांस्कृतिक आयोजन तज्ञांनी जाहीर व्यक्त केले आहे.

किल्ले सिंधुदुर्ग आणि ‘समुद्र कृतज्ञ मालवणकरांचे’ दैवत श्री दांडेश्वर स्थान या दोघांचाही भौगोलिक रक्षणाचा आशिर्वाद लाभलेल्या दांडी किनारची नगरपरिषद पर्यटन महोत्सवाची सायंकाळ ही कोरोनाकाळानंतर हरवत चाललेल्या पर्यटन व्यावसायिक कुलुपांची चावी व जल्लोषाची नवसंजीवनी ठरली आहे अशी प्रतिक्रिया यावेळी मालवणच्या शिवप्रेमी समाज सेविका सौ शिल्पा यतीन खोत व इतर उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

‘नगरपरिषद पर्यटन महोत्सव जल्लोष http://localhost/news/public/uploads/2022’ मंचावरुन सर्व जबाबदार मान्यवर दिग्गजांनी असा पर्यटन महोत्सव दरवर्षी आयोजीत होईलच अशी दिलेली ग्वाही जिल्हा सांस्कृतीक क्षेत्रातील मालवणसह अनेक पर्यटन क्षेत्रांसाठी पोषक ठरेल अशी उपस्थितांची प्रतिक्रिया आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स