मसुरे गडघेरावाडी येथील दत्तमंदिरचा १५ मे रोजी वर्धापनदिन..!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मसुरे गडघेरावाडी येथील दत्तमंदिरच्या वर्धापन दिनानिमित्त १५ मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८.३० वा श्री दत्त मुर्तिवर अभिषेक,श्री सत्यनारायणाची महापूजा, आरती व तीर्थप्रसाद, दुपारी १ ते ३. महाप्रसाद, सांयकाळी ७.०० श्री दत्ताची महाआरती, रात्री ९.००
दिडींनृत्य. श्री देव गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ (चिंदर पालकरवाडी) बुवा – श्री. शिशिर पालकर, श्री देवी भगवती प्रासादिक भजन मंडळ (चिंदर भटवाडी) बुवा – श्री. संदिप परब सहभागी होणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)