श्री ब्राह्मणदेव मंदिराचा प्रथम वर्धापनदिन सोहळा १४ मे पासून.
मसुरे |प्राजक्ता पेडणेकर : देवगड तालुक्यातील मुणगे कारीवणेवाडी येथील श्री ब्राह्मणदेव मंदिराच्या पुनर्बांधणीचा प्रथम वर्धापनदिन सोहळा १४ आणि १५ मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. १४ मे रोजीसकाळी ०९.०० वाजता लघुरुद्र, दुपारी १२ वाजता तीर्थ प्रसाद, दुपारी महाप्रसाद, रात्री ०८.०० वाजता सुस्वर भजन. १५ मे रोजीसकाळी ०८.०० वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, सकाळी ११.०० वाजता मान्यवरांचे सत्कार, दुपारी ०१.०० वाजता महाप्रसाद,रात्री ०९.०० वाजता संगीत डबलबारी भजनाचा (२०x२०) सामना बुवा श्री. व्यकटेश नर (निनादेवी प्रासादिक भजन मंडळ, उंडिल) पखवाज श्री सागर कदम, तबला श्री भावेश लाड विरुद्ध बुवा श्री. दुर्वास गुरव (श्री बिमलेश्वर प्रासादिक भजन मंडळ, परेल) तबला तुषार शिंदे,पखवाज नितीन घाडी यांच्यात हा सामना होणार आहे.उपस्थित राहण्याचे आवाहनकारिवणेवाडी ब्राह्मणदेव प्रासादिक विकास मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)