ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
डेगवे येथील जि.प.प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना श्री उल्हास देसाई परीवारातर्फे विविध पारितोषिके.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

डेगवे येथील जि.प.प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना श्री उल्हास देसाई परीवारातर्फे विविध पारितोषिके.

प्रकाशन: 12 May 2022 06:17 PM
वाचन संख्या 52

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील डेगवे गावच्या ज्या प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे सरचिटणीस तथा ग्रंथमित्र श्री उल्हास बाबाजी देसाई आणि बंधू परीवारातर्फे माध्यमिक विद्यालय,डेगवे या शाळेती इयत्ता ५ वी ते १० वीच्या पहिल्या क्रमांकाने उतीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी पारितोषिके देण्यासाठी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ,मुंबई या संस्थेकडे रुपये १०,०००/-ची देणगी देऊन समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. तसेच जि.प.प्राथमिक शाळा डेगवे नं.१ या शाळेतील इयत्ता १ ली ते ४थीच्या शाळेतील सावित्रीबाई फुले दत्तक योजनेखाली प्रत्येकी एका गरीब विद्यार्थ्यां करीता रुपये ३,०००/-ची कायमस्वरूपी रक्कम मुख्याध्यापकाकडे दिली आहे.त्या देणगीच्या व्याजातून सदर एका गरीब विद्यार्थ्थाची शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे.

शिवाय जि.प.प्राथमिक शाळा आंबेखणवाडीच्या इयत्ता १ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी पारीतोषिके गेली कित्येक वर्षे दिली जातात.

सदर देणगीच्या प्रतिवर्षी येणाऱ्या व्याजातून त्यांनी आपले आजोबा स्व.भानु बाबलो देसाई व आजी स्व.सौ.सुंदराबाई भानु देसाई व वडील स्व.बाबाजी भानु देसाई व् आई स्व.सौ.सावित्रीबाई बाबाजी देसाई व मामा स्व.लाडू भिवा मळीक.यांच्या स्मरणार्थ सदर पारीतोषिके दिली आहेत.

Article image

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स