मालवण तालुक्यात सर्वाधिक 30 मि.मी. पाऊस
आपली सिंधुनगरी न्यूज
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी ) : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 30 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 14.825 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2711.385 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 14(2633), सावंतवाडी – 21(2915.10), वेंगुर्ला – 11.6 (2231), कुडाळ – 17(2569), मालवण – 30(2948), कणकवली – 12(2957), देवगड – 04(2390), वैभववाडी – 09(3048), असा पाऊस झाला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)