ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
राहिलेल्या एस टी बस फेऱ्या तातडीने सुरु करा…

राहिलेल्या एस टी बस फेऱ्या तातडीने सुरु करा…

प्रकाशन: 30 Jul 2021 04:01 PM
वाचन संख्या 85


आपली सिंधुनगरी न्यूज


मालवण (प्रतिनिधी) : मालवण आगारातून सुरू असलेल्या ग्रामीण तसेच कुडाळ कणकवली शहरात सुरू असलेल्या व कोरोना काळात बंद असलेल्या एस टी बस फेऱ्या तातडीने चालू कराव्यात अशी मागणी शिवसेना मालवण तालुका प्रमुख हरी खोबरेकर व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली.

मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने मालवण आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांची आज दुपारी भेट घेतली यावेळी तालुका प्रमुख हरी खोबरेकर, उपजिल्हा प्रमुख शिंदे, किरण वाळके, उपशहर प्रमुख बाळू,नाटेकर, तारी,उपतालुका प्रमुख गणेश कुडाळकर, मोहन मराळ, प्रसाद आडवणकर हे उपस्थित होते.

कोरोना काळात मालवण तालुक्यातील ग्रामीण भाग तसेच कुडाळ कणकवली येथील बंद असलेल्या एसटी बस फेऱ्या तातडीने सुरू कराव्यात तसेच मालवण तालुक्यातील कोरोना प्रभाव कमी असलेल्या गावातील एसटी बस फेऱ्या सुरू करून नागरिकांची होणारी परवड थांबविण्यात यावी तसेच नोकर वर्गाना कामाच्या ठिकाणी अतिरिक्त खर्च करून मालवण तालुक्यात यावे लागत आहे त्यामुळे मालवण शहरात येणाऱ्या बस फेऱ्या सुरू कराव्यात. आचरा चिंदर, मसुरे देवबाग, कुडाळ कणकवली याठिकाणच्या बस फेऱ्या पूर्ववत कराव्यात अशी मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स