ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
मालवणात १३ मे रोजी 'आमदार वैभव नाईक श्री शरीर सौष्ठव' स्पर्धा..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मालवणात १३ मे रोजी 'आमदार वैभव नाईक श्री शरीर सौष्ठव' स्पर्धा..!

प्रकाशन: 11 May 2022 09:13 PM
वाचन संख्या 58

मालवण दांडी बीच येथील पर्यटन महोत्सवातील एक महत्वाचा कार्यक्रम…!

कणकवली | प्रतिनिधी : आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मान्यतेने तसेच सिंधुरत्न कला क्रीडा मंडळ मालवण व युवक कल्याण संघ कणकवली यांच्या वतीने भव्य जिल्हास्तरीय ‘आमदार वैभव नाईक श्री’ शरीर सौष्ठव स्पर्धा २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे.मालवण दांडी बीच येथील पर्यटन महोत्सवात १३ मे २०२२ रोजी सायंकाळी ०५ ते १० वा.या वेळेत ही स्पर्धा संपन्न होणार आहे.

ही स्पर्धा ५५ ते ६० किलो, ६० ते ६५ किलो, ६५ ते ७० किलो, ७० ते ७५ किलो या चार वजनी गटात होणार आहे. स्पर्धा विजेत्यास रोख रु २१ हजार व आकर्षक चषक, बेस्ट पोझर साठी २ हजार व मोस्ट इम्पवृड साठी २ हजार तसेच आकर्षक चषक त्याचप्रमाणे प्रत्येक गटातील प्रथम क्रमांकास २ हजार ५००,द्वितीय क्रमांकास २ हजार, तृतीय क्रमांकास १ हजार ५००, चतुर्थ क्रमांक १२००, पाचवा क्रमांक १००० तसेच आकर्षक चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

मुंबई व सिंधुदुर्ग मधील नामवंत पंच मंदार आगवणकर उमेश कोदे, किशोर सोनसुरकर, अमोल तांडेल, सुधीर हळदणकर हे स्पर्धेचे परीक्षण करणार आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुठल्याही स्पर्धकांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन सिंधुरत्न कला क्रीडा मंडळ मालवणच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स