ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
मडुरा-पाडलोस सीमेवर सुरू असलेल्या कालव्याच्या पुलावरील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण पूर्ण..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मडुरा-पाडलोस सीमेवर सुरू असलेल्या कालव्याच्या पुलावरील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण पूर्ण..!

प्रकाशन: 11 May 2022 09:35 PM
वाचन संख्या 32

बांदा | राकेश परब : मडुरा-पाडलोस समीवर सुरू असलेल्या कालव्याच्या पुलावरील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करून काम अखेर पूर्णत्वास आले. शिवसेना सावंतवाडी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर यांनी पंधरा दिवसांची आंदोलनासंदर्भात दिलेली डेटलाईन बांधकाम विभागाने पाळून वाहनचालक, प्रवाशांसाठी पूल निर्धोक केल्याने समाधान व्यक्त होत आहे.
मडुरा रेल्वे स्टेशनजवळ बांदा शिरोडा मार्गावरील पाडलोस येथे कालव्याच्या कामासाठी सुस्थितीत असलेला चांगला रस्ता उखडण्यात आला. पुलाचे काम पूर्ण होऊन सुद्धा याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे झालेल्या दुर्लक्षामुळे अनेक अपघातही घडलेत. परंतु झोपी गेलेले प्रशासन जागे होत नसल्याने उपतालुकाप्रमुख राजू शेटकर यांनी सर्वाभिमूख आंदोलन छेडण्याचा लेखी इशारा दिला होता. याची दखल घेत पुलावरील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स