ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कणकवली शहराला पाणीटंचाईची भेडसावणारी समस्या सुटणार : नगराध्यक्ष समीर नलावडे

कणकवली शहराला पाणीटंचाईची भेडसावणारी समस्या सुटणार : नगराध्यक्ष समीर नलावडे

प्रकाशन: 11 May 2022 08:07 PM
वाचन संख्या 88

उद्या दुपारपर्यंत शिवडाव धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही केली जाणार..!

कणकवली | बंटी राणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहराला भेडसावणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे व मुख्याधिकारी अवधुत तावडे यांनी आज तातडीने यासंदर्भात कार्यवाही केली. काल जलसंपदा विभागाला मुख्याधिकार्‍यांनी पत्र व्यवहार केल्यानंतर नगराध्यक्षांनी देखील या विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. आज जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता महादेव कदम यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी भेट घेत नगरपंचायतमध्ये चर्चा केली . या भेटीदरम्यान शिवडाव धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्याची मागणी करण्यात आली. त्यावर कणकवली नगरपंचायत कडून http://localhost/news/public/uploads/2016- http://localhost/news/public/uploads/2017 मधील 2 लाख 4 हजार 700 रुपये पाणीपट्टी येणे बाकी असल्याने ती भरणा करण्याची मागणी विभागाकडून करण्यात आली.त्यावर ही रक्कम तातडीने भरणा करण्यात येईल असे नगराध्यक्ष श्री नलावडे यांच्याकडून सांगण्यात आले. अशा सूचना देखील संबंधितांना देण्यात आल्या. त्यावर उद्या दुपारपर्यंत शिवडाव धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्याबाबत प्रत्यक्ष कार्यवाही केली जाईल असे आश्वासन कार्यकारी अभियंत्यांनी दिल्याची माहिती नगराध्यक्ष श्री नलावडे यांनी दिली. शिवडाव धरणाचे पाणी नदीपात्रात सोडल्यामुळे येत्या पावसाळ्यापर्यंत कणकवली शहराला पाणीटंचाईची भेडसावणारी समस्या सुटणार आहे. यावेळी उप अभियंता महेश हिरेगोदार उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स